भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात कॅरेबियन संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. भारताचा कप्तान रोहित शर्माने पुन्हा एकदा उत्कृष्ट नेतृत्व केले आणि गोलंदाजांचा चांगला उपयोग करून घेतला. या सामन्यात पुन्हा एकदा माजी कर्णधार विराट कोहली रोहितला डीआरएस घेण्यात मदत करताना दिसला.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रोहित शर्मा डीआरएस घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून येते, परंतु जेव्हा विराटने त्याला राजी केले, तेव्हा त्याने विचार न करता रिव्ह्यू घेण्याचे ठरवले. ही घटना ८व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर घडली. फिरकीपटू रवी बिश्नोईचा चेंडू रोस्टन चेसच्या पॅड आणि बॅटच्या जवळ जाऊन ऋषभ पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला. सर्व खेळाडूांनी पंचांकडे अपील केले, पण पंचांनी या चेंडूला वाइड ठरवले. त्यानंतर विराटने रोहितला हा डीआरएस घेण्यास सांगितले. तेव्हा रोहिचने रिव्ह्यू घेतला.

हेही वाचा – VIDEO : असं कोण शुभेच्छा देतं? वसीम जाफरच्या बर्थडेला वॉननं केलं ट्वीट; मग पुढं काय झालं वाचा!

रिप्लेवरून असे दिसून आले, की चेंडू चेसच्या बॅटला लागला नाही, त्यामुळे त्याला नाबाद दिले गेले. पण चेंडू स्टम्पला लागल्यामुळे पंचांना आपला वाइडचा निर्णय बदलावा लागला. चेसला या सामन्यात फक्त ४ धावा करता आल्या. मात्र, या घटनेवरून रोहित विराटवर किती विश्वास ठेवतो आणि त्याचे ऐकतो हे पुन्हा एकदा दिसून आले.

Story img Loader