IND vs WI 2nd T20I Live Score Updates Ranchi Match Shreyas Iyer: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज रांचीमध्ये खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजचा दणदणीत पराभव करत १-० अशी आघाडी मिळवली आहे. आता दुसरा सामना जिंकत ही आघाडी अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने संघ मैदानावर उतरणार आहे.

Live Updates

IND vs WI 2nd T20I Ranchi Live Updates: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

22:55 (IST) 9 Oct 2026

West indies beat India: वेस्ट इंडिजचा भारतावर दणदणीत विजय

वेस्ट इंडिज संघाने भारतावर ६ विकेट्सने विजय मिळवला.

22:26 (IST) 9 Oct 2026

IND vs WI 2nd T20I Live: कुलदीपच्या फिरकीची जादू

कुलदीप यादवने शे होप व शेरफेन रूदरफोर्ड यांची १२० धावांची भागीदारी मोडत भारताला महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिला.

21:51 (IST) 9 Oct 2026

IND vs WI Live: वेस्ट इंडिजच्या १०० धावा पूर्ण

वेस्ट इंडिजने ९ व्या षटकांत १०० धावा पूर्ण केल्या आहेत. शे होप अर्धशतकाच्या जवळ आहे.

21:35 (IST) 9 Oct 2026

IND vs WI Live: पॉवेल परतला माघारी

वेस्ट इंडिजला तिसरा धक्का बसला आहे. पॉवेल २४ धावा करून माघारी परतला आहे.

21:31 (IST) 9 Oct 2026

IND vs WI Live: वेस्ट इंडिजच्या ५० धावा पूर्ण

सुरूवातीलाच २ मोठे धक्के बसल्यानंतर वेस्ट इंडिजने दमदार पुनरागमन केलं आहे. शे होपच्या फटकेबाजीच्या बळावर वेस्ट इंडिजने पाचव्या षटकांत ५० धावांचा पल्ला गाठला आहे.

21:14 (IST) 9 Oct 2026

IND vs WI Live: मयंक यादवची भन्नाट सुरूवात! वेस्ट इंडिजचे २ फलंदाज तंबूत

भारतीय संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या मयंक यादवने दमदार सुरूवात करून दिली आहे. आहे. त्याने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर वेस्ट इंडिजला लागोपाठ २ मोठे धक्के दिले आहेत.

20:54 (IST) 9 Oct 2026

IND vs WI live: भारताने किती धावांचा डोंगर उभारला

भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई करत धावांचा डोंगर उभारला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत २४९ धावा केल्या आहेत. यामध्ये संजू सॅमसनने ८० धावा, अभिषेक शर्माने २० धावा, इशान किशनच्या ४३ धावा तर शिवम दुबे ९ धावा करत बाद झाला. यानंतर आलेल्या तिलक वर्मा व श्रेयस अय्यर यांनी ८३ धावांची भागीदारी रचत संघाला २०० धावांच्या पार नेलं. श्रेयस अय्यरने ४० धावा तर तिलक वर्माने ४४ धावांची खेळी केली. तर अखेरच्या चेंडूवर फलंदाजीला आलेल्या नमनने चौकार खेचला.

20:50 (IST) 9 Oct 2026

IND vs WI live: तिलक वर्माची षटकारांची हॅटट्रिक

अखेरच्या षटकात स्प्रिंगर पुन्हा गोलंदाजीला आला आणि तिलकने त्याची धुलाई केली. तिलक वर्माने पहिल्या ३ षटकांत ३ षटकार लगावत १८ धावा कुटल्या.

20:44 (IST) 9 Oct 2026

IND vs WI live: भारताच्या २०० धावा पूर्ण

१८व्या षटकात भारताने २०० धावांचा पल्ला गाठला आहे. शमार स्प्रिंगरने टाकलेल्या १८व्या षटकात श्रेयस-तिलकने २१ धावा कुटत २०० धावांचा पल्ला पार केला आणि १८ षटकांत २१५ धावा बोर्डावर लावल्या.

20:22 (IST) 9 Oct 2026

Sanju samson wicket: संजू सॅमसन झेलबाद

संजू सॅमसन ८२ धावा करत झेलबाद झाल्याने त्याचं शतक हुकलं. कामिल पुरनने त्याचा पहिला झेल सोडला आणि त्याला जीवदान दिलं होतं आणि अखेरीस त्यानेच झेल टिपत त्याला बाद केलं. यासह भारताने १५ षटकांत ४ बाद १६९ धावा केल्या आहेत.

20:15 (IST) 9 Oct 2026
Shivam Dube Wicket: रोस्टन चेसच्या खात्यात तिसरी विकेट

१४व्या षटकात रोस्टन चेसने शिवम दुबेला बोल्ड करत माघारी धाडलं. रोस्टन चेसच्या षटकातील पहिल्या चेंडूवर दुबेने षटकार खेचला, तर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिवम दुबेने चेंडू मारला आणि त्याच्या पायाला चेंडू लागून स्टंपवर आदळला.

20:11 (IST) 9 Oct 2026

IND vs WI live:भारत दीडशे धावांच्या पुढे

संजू सॅमसन व इशान किशनच्या ९७ धावांच्या खेळीसह भारत १२ षटकांतच १५० धावांच्या पलीकडे पोहोचला आहे. सध्या संजू ८० धावा तर दुबे नुकताच मैदानावर आला आहे. यासह भारताने १३ षटकांत २ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या आहेत.

19:59 (IST) 9 Oct 2026

IND vs WI live: इशान किशन क्लीन बोल्ड

रोस्टन चेसने १३व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर इशान किशनला क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. इशान २२ चेंडूत ४३ धावांची खेळी करत बाद झाला.

19:53 (IST) 9 Oct 2026

IND vs WI 2nd T20I Live: 10 षटकांत भारताने किती धावा केल्या?

संजू सॅमसन व इशान किशनच्या जोडीने आतापर्यंत ३६ चेंडूत ८५ धावांची भागीदारी साकारली आहे. यासह भारताने १० षटकांत १ बाद १२७ धावा केल्या आहेत. इशान ३३ धावा तर संजू ७२ धावांवर खेळत आहे.

19:31 (IST) 9 Oct 2026

Sanju Samson Fifty: संजू सॅमसनचं अर्धशतक

संजू सॅमसनने पॉवरप्लेमध्येच आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. संजूला दोन वेळा जीवदान मिळाल्यानंतर त्याने २१ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. यासह भारताने पॉवरप्लेमध्ये १ विकेट गमावत ८० धावा केल्या आहेत.

19:28 (IST) 9 Oct 2026

IND vs WI live: संजूची बॅट तळपली

संजू सॅमसनला जीवदान मिळाल्यानंतर त्याने अभिषेक शर्माच्या विकेटचा वेस्ट इंडिजकडून चांगलाच बदला घेतला. संजू सॅमसनने पाचव्या षटकात २ चौकार व २ षटकार लगावत २२ धावा कुटल्या. अकील हुसैनच्या प्रत्येक चेंडूवर संजूने कमालीची फटकेबाजी केली.

19:19 (IST) 9 Oct 2026

IND vs WI live: अभिषेक शर्मा झेलबाद

दुसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. अभिषेकने या सामन्यात २० धावा करत माघारी परतला.

19:15 (IST) 9 Oct 2026

IND vs WI live: संजू सॅमसन थोडक्यात वाचला

दुसऱ्या षटकात अकील हुसैनच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनने चौकार लगावला आणि यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने फटका मारला जवळपास चेंडू फिल्डरच्या हातात होता, पण कामिल पुरनकडून झेल सुटला. यानंतर पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळताच संजूने डाऊन द ग्राऊंड षटकार खेचला. यासह भारताने ३ षटकांत बिनबाद ३५ धावा केल्या.

19:00 (IST) 9 Oct 2026
IND vs WI: सामन्याला सुरूवात

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताकडून संजू सॅमसन व अभिषेक शर्माची जोडी मैदानावर उतरली आहे. तर वेस्ट इंडिजकडून अकील हुसैनने गोलंदाजीला सुरूवात करत आहे. अभिषेक शर्माने पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार खेचला.

18:51 (IST) 9 Oct 2026

India Playing 11: भारताची प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि मयंक यादव.

18:51 (IST) 9 Oct 2026

West Indies Playing 11: वेस्ट इंडिजची प्लेईंग इलेव्हन

शे होप (कर्णधार आणि यष्टीरक्षक), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, गुडाकेश मोती, शामर स्प्रिंगर, अकील हुसेन आणि शामर जोसेफ.

18:31 (IST) 9 Oct 2026
IND vs WI Toss: नाणेफेक

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याची नाणेफेक विडींज संघाने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह भारताचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. वेस्ट इंडिजच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये गुडाकेश मोती परतला आहे, तर भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

18:25 (IST) 9 Oct 2026

१४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! ऑस्ट्रेलियाने उतरवली सर्वात वयस्कर प्लेईंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ऑस्ट्रेलिया संघाने प्लेईंग इलेव्हन जाहीर करत अनोखा विक्रम केला आहे, जो १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात आजवर घडला नव्हता. ...अधिक वाचा
17:28 (IST) 9 Oct 2026

द. आफ्रिकेतल्या सुपरमार्केट स्टोरने ऑस्ट्रेलियाची उडवली खिल्ली, ३१ ऑक्टोबरपर्यंत सँडपेपर विक्रीवर घातली बंदी

Sandpapergate Controversy: ऑस्ट्रेलिया संघ आठ वर्षांनी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या सुपरमार्केट्सने संघाचं विचित्र पद्धतीने स्वागत केलं. ...अधिक वाचा
17:03 (IST) 9 Oct 2026

साखर, ग्लुटेन, लॅक्टोज बंद! भुवनेश्वरने वजन घटवलं, डाएट बदललं, फिटनेसवर घेतली मेहनत; फिजिओने कमबॅक करण्यात कशी केली मदत?

Bhuvneshwar Kumar Comeback Story: भुवनेश्वर कुमारने ४ वर्षांनंतर भारताच्या टी-२० संघात पुनरागमन केलं आहे. पण त्याच्या पुनरागमनामागे त्याने काय व कशी मेहनत घेतली, पाहूया. ...सविस्तर बातमी
16:47 (IST) 9 Oct 2026

IND vs WI 2nd T20I: सामना किती वाजता सुरू होणार?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज खेळवली जात आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात असून संध्याकाळी ७ वाजता सामन्याला सुरूवात होईल. त्यापूर्वी ६.३० वाजता सामन्याची नाणेफेक होईल.

India vs West Indies T20I Live Updates: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज रांचीमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स.