scorecardresearch

Premium

IND vs WI 5th T20: विजयाची हॅटट्रिक साधत टीम इंडिया मालिका जिंकणार की विंडीज कमबॅक करणार? अशी असेल प्लेईंग ११

India vs West Indies 5th T20: वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा टी२० सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा असेल. अशा परिस्थितीत टीम इंडियाला विजयी संघात कोणताही बदल करायला आवडणार नाही. मात्र, वेस्ट इंडिज संघात दोन बदल होऊ शकतात.

IND vs WI 5th T20: Gil-Jaiswal's place confirmed Suryakumar or Tilak at number three Know Possible Playing-11
वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा टी२० सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा असेल. सौजन्य- (ट्वीटर)

IND vs WI Playing 11 Prediction Today Match: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल. सध्या मालिका २-२ अशी बरोबरीत आहे. पहिले दोन सामने विंडीजने जिंकले होते. त्याचवेळी भारताने पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकला. आता शेवटचा सामना निर्णायक असेल. सलग दोन विजयानंतर टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता कमी असली तरी वेस्ट इंडिजच्या संघात अनेक बदल होऊ शकतात.

भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमात नक्कीच बदल होऊ शकतो. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता, पण चौथ्या टी२०मध्ये तिलक वर्माला बढती देत तिसऱ्या क्रमांकवर पाठवण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाचव्या सामन्यात बॅटिंग ऑर्डरमध्ये काय बदल होतात आणि सूर्या कुठल्या जागी फलंदाजीसाठी येऊ शकतो? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. मात्र, भारतीय संघाच्या प्लेईंग ११मध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

IND vs ENG 4th Test Match Updates in marathi
IND vs ENG 4th Test : इंग्लंडला मोठा धक्का! ‘या’ स्टार गोलंदाजाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून घेतली माघार
India Zimbabwe Tour Announced
IND vs ZIM : टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ महिन्यात करणार झिम्बाब्वेचा दौरा
Ravindra Jadeja Injury Updates
IND vs ENG : टीम इंडियाला आणखी एक धक्का, स्टार अष्टपैलू खेळाडू दुसऱ्या कसोटीला मुकणार?
U19 World Cup 2024 Super Six Stage Schedule Announced
U19 WC: अंडर १९ विश्वचषकातील ‘सुपर सिक्स’चे वेळापत्रक जाहीर, भारताचा सामना कोणकोणत्या संघाविरुद्ध होणार?

हेही वाचा: IND vs WI 4th T20: टीम इंडिया ‘यशस्वी’ भव! जैस्वाल- शुबमनच्या खेळीने वेस्ट इंडीज भुईसपाट, मालिकेत २-२ बरोबरी

कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यात आवेश खान आणि उमरान मलिक यांना संधी देऊ शकला असता, परंतु ही मालिका निर्णायक आहे आणि या विजयासह हार्दिकला त्याच्या नेतृत्वाखाली एकही टी२० मालिका न गमावण्याचा विक्रम कायम ठेवायचा आहे. दडपणाखाली भारतीय संघाने दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असून मालिका जिंकून हार्दिकला संपूर्ण संघाचा आत्मविश्वास उंचावायचा आहे.

वेस्ट इंडिजमध्ये बदलाची अधिक शक्यता

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेल याने या बदलाबाबत आधीच सांगितले होते. जरी याच कारणामुळे वेस्ट इंडिज संघात बदल करण्यात येत असले तरी सलग दोन पराभवानंतर कॅरेबियन संघावर आता मालिका गमावण्याचे दडपण असणार आहे. या सामन्यातही पॉवेल आपल्या संघात बदल करू शकतो. ओडियम स्मिथच्या जागी अल्झारी जोसेफचा संघात समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

हेही वाचा: Hockey Asian Champions Trophy: चक दे इंडिया! ४-३ने मलेशियाला धूळ चारत भारताने कोरले चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव

दोन्ही संघांचे संभाव्य खेळ-११

वेस्ट इंडिज: ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, अकिल हुसेन, ओबेद मॅककॉय.

भारत: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs wi 5th t20 india and west indies can field these 11 players in fifth t20 know possible playing xi avw

First published on: 13-08-2023 at 13:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×