India vs West Indies Live Cricket Score Updates, T20 WC 2026 Super-8: टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ मधील करो या मरो सामना आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावर होत आहे. या सामन्यातील विजेता संघ अ गटातून सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. त्यामुळे हा सामना फारच अटीतटीचा होणार आहे.

Live Updates

IND vs WI Super-8 T20 World Cup 2026 Match Live Updates: भारत आणि वेस्ट इंडिज टी-20 विश्वचषक २०२६ मधील सुपर-८ सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

22:48 (IST) 1 Mar 2026

IND vs WI Live: संजूचा दणदणीत षटकार

संजू सॅमसनने अखेरच्या षटकात ७ धावांची गरज होती. त्याने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत भारताला सेमीफायनलमध्ये नेलं आहे.

22:41 (IST) 1 Mar 2026

IND vs WI Live: भारताला १२ चेंडूत किती धावांची गरज?

टीम इंडियाने १८ षटकांत ४ बाद १७९ धावा केल्या आहेत. यासह आता भारताला विजयासाठी १२ चेंडूत १७ धावांची गरज आहे.

22:24 (IST) 1 Mar 2026

48 Iranian leaders killed Trump claim : "अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात ४८ इराणी नेते मारले गेले", अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

US President Donald Trump claims 48 Iranian leaders killed : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध आता निर्णायक वळणावर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केला आहे की, अमेरिकन आणि इस्रायली फौजांच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे ४८ बडे नेते मारले गेले आहेत. ...सविस्तर वाचा
22:24 (IST) 1 Mar 2026

48 Iranian leaders killed Trump claim : "अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात ४८ इराणी नेते मारले गेले", अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

US President Donald Trump claims 48 Iranian leaders killed : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध आता निर्णायक वळणावर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केला आहे की, अमेरिकन आणि इस्रायली फौजांच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे ४८ बडे नेते मारले गेले आहेत. ...सविस्तर वाचा
22:20 (IST) 1 Mar 2026
Tilak Varma Wicket: जेसन होल्डरने भारताला दिला धक्का

जेसन होल्डरने १५व्या षटकात भारताला मोठा धक्का दिला. तिलक वर्मा होल्डरच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न करताना हेटमायरकरवी झेलबाद झाला. तिलक १५ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह २७ धावा करत बाद झाला.

22:13 (IST) 1 Mar 2026

IND vs WI Live: भारताला विजयासाठी किती धावांची गरज

भारताने १४ षटकांत ३ बाद १३६ धावा केल्या आहेत. संजू सॅमसन व तिलक वर्माची जोडी मैदानावर आहे. यासह आता भारताला अखेरच्या ६ षटकांत म्हणजेच ३६ चेंडूत ६० धावांची गरज आहे.

21:58 (IST) 1 Mar 2026
IND vs WI: सूर्याच्या रूपात भारताला मोठा धक्का

शमार जोसेफच्या ११व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कर्णधार सूर्या झेलबाद झाला. शेरफन रूदरफोर्डने कमालीचा लो कॅच टिपला आणि भारताला तिसरा धक्का दिला आहे.

21:53 (IST) 1 Mar 2026

Sanju Samson Fifty: संजू सॅमसनचं अर्धशतक

संजू सॅमसनने २६ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह टी-२० विश्वचषक २०२६ मधील आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. भारताने एका टोकाकडून दोन विकेट्स गमावल्यानंतर संजूने एका टोकाकडून सूर्याबरोबर संघाचा डाव सावरला. याशिवाय संजू व सूर्याने अर्धशतकी भागीदारीदेखील पूर्ण केली आहे. तर १० षटकांत टीम इंडियाने २ बाद ९८ धावा केल्या आहेत. तर भारताला विजयासाठी ६० चेंडूत ९८ धावांची गरज आहे.

21:28 (IST) 1 Mar 2026

IND vs WI Live Score: भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का

भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. इशान किशन अवघ्या १० धावा करून माघारी परतला आहे.

21:17 (IST) 1 Mar 2026

IND vs WI: अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी

अकिल हुसैन तिसरं षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकात संजू सॅमसनने २ षटकार व एका चौकार लगावत १६ धावा कुटल्या होत्या. यानंतर अखेरच्या चेंडूवर अभिषेक मोठा फटका मारायला गेला पण चेंडू हवेत उंच उडाला आणि हेटमायरने कोणतीही चूक न करता कमालीचा झेल टिपला.

21:01 (IST) 1 Mar 2026

IND vs WI live: रन चेसला सुरूवात

वेस्ट इंडिजने दिलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा व संजू सॅमसनची जोडी उतरली आहे. तर वेस्ट इंडिजकडून फिरकीपटू अकिल हुसैन गोलंदाजीला आला आहे.

20:48 (IST) 1 Mar 2026
IND vs WI live: वेस्ट इंडिजने विजयासाठी किती धावांचं लक्ष्य दिलं?

अखेरच्या षटकांमध्ये वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारताविरूद्ध कमालीची फटकेबाजी केली. रोव्हमन पॉवेल व जेसन होल्डर यांनी संघाचा डाव सावरला आणि दोघांनी पाचव्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली. यासह वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ बाद १९५ धावा केल्या आहेत. एकावेळेला १५ षटकांत वेस्ट इंडिज ४ बाद १२५ धावांवर होता, पण पॉवेल-होल्डरने उत्कृष्ट कामगिरी केली, याशिवाय अभिषेक शर्माने सोडलेला पॉवेलचा एक झेलदेखील कारणीभूत ठरला.

आता भारताला विजयासाठी २० षटकांत १९६ धावा करायच्या आहेत. भारताने टी-२० विश्वचषकात यापूर्वी कधीच १७५ अधिक धावांचं लक्ष्य गाठलं नाही. त्यामुळे भारताला हा विजय मिळवण्यासाठी ऐतिहासिक कामगिरी करावी लागणार आहे.

20:37 (IST) 1 Mar 2026

IND vs WI live: पॉवेल व होल्डरची उत्कृष्ट भागीदारी

रोवमन पॉवेल व जेसन होल्डर यांनी उत्कृष्ट फटकेबाजी करत २२ चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली आहे. याशिवाय बुमराहच्या १८व्या षटकात २ चौकार मारत १२ धावा केल्या. यासह १८ षटकांत १७५ धावांचा पल्ला गाठला आहे.

20:27 (IST) 1 Mar 2026
IND vs WI live: अर्शदीपच्या षटकात दोन षटकार

१६व्या षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर रोव्हमन पॉवेलने चांगलीच फटकेबाजी केली. २ षटकार चौकारासह त्याने २४ धावा कुटल्या. यासह आता १६ षटकांत वेस्ट इंडिजने ४ बाद १४९ धावा केल्या आहेत.

20:16 (IST) 1 Mar 2026

IND vs WI live: रूदरफोर्ड झेलबाद

१५वं षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिक पंड्याच्या पहिल्याच चेंडूवर रूदरफोर्ड फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेत बाद झाला. सॅमसनने सोपा झेल टिपत संघाला चौथी विकेट मिळवून दिली.

20:14 (IST) 1 Mar 2026

IND vs WI Live: १४ षटकांत किती धावा?

बुमराहने १२व्या षटकात दोन विकेट्स घेतल्यानंतर आता वेस्ट इंडिजच्या धावांना ब्रेक लागला आहे. रूदरफोर्ड व पॉवेलची जोडी मैदानावर असून वेस्ट इंडिजने १४ षटकांत ३ बाद ११९ धावा केल्या आहेत.

20:03 (IST) 1 Mar 2026

WI vs IND Live: बुमराहच्या षटकात दुसरी विकेट

बुमराहच्या १२व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रोस्टन चेसदेखील झेलबाद झाला आहे. सूर्याने हवेत झेप घेत हा कमालीचा झेल टिपला आहे. यासह वेस्ट इंडिजने एका षटकात २ विकेट्स गमावले आणि १२ षटकांत ३ बाद १०२ धावा केल्या आहेत.

20:02 (IST) 1 Mar 2026

WI vs IND Live: शिमरॉन हेटमायर बाद

हेटमायरला बुमराहने आजवर ९ पैकी ५ डावांमध्ये बाद केलं होतं. त्यामुळे सूर्याला अखेरीस बुमराहला गोलंदाजीला पाचारण केलं. बुमराह १२वं षटक टाकण्यासाठी आला आणि तिसऱ्या चेंडूवरच हेटमायरला त्याने झेलबाद केलं. बुमराहच्या लेंग्थ चेंडूवर हेटमायर खेळायला गेला आणि बॅटची कड घेत चेंडू सॅमसनच्या हातात गेला. यासह भारताला महत्त्वाची विकेट मिळाली.

19:54 (IST) 1 Mar 2026

WI vs IND Live: हेटमायरची फटकेबाजी

शिमरॉन हेटमायरने येताच हार्दिकच्या षटकात एक षटकार लगावला. यानंतर वरूणच्या ११व्या षटकात चौकार-षटकार लगावत १७ धावा कुटल्या. यासह ११ षटकांत वेस्ट इंडिजने ९९ धावा केल्या आहेत.

19:43 (IST) 1 Mar 2026
IND vs WI Live updates: वरूण चक्रवर्तीने टीम इंडियाला मिळवून दिला ब्रेकथ्रू

वरूण चक्रवर्तीने येताच नवव्या षटकात भारताला पहिली विकेट मिळवून दिली आहे. वरूणने शे होपला क्लीन बोल्ड केलं. होप ३३ चेंडूत ३२ धावा करत बाद झाला.

https://twitter.com/Haloveltoon/status/2028111419670143218

19:40 (IST) 1 Mar 2026

IND vs WI: टीम इंडिया विकेटच्या प्रतिक्षेत

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याची ८ षटकं झाली असून अद्याप संघाने एकही विकेट गमावलेली नाही. हार्दिक व अक्षर पटेल यांनी अनुक्रमे ७वी ८वी षटकं टाकली... पण संघाला विकेट मिळाली नाही. आता ८ षटकांत वेस्ट इंडिजने ६६ धावा केल्या आहेत.

19:28 (IST) 1 Mar 2026

IND vs WI: पॉवरप्ले

वेस्ट इंडिजने भारताच्या गोलंदाजीविरूद्ध सावध सुरूवात केली आणि अनेक डॉट बॉल खेळले. संधी मिळताच मोठे फटकेदेखील मारले. तर बुमराहच्या षटकात अभिषेक शर्माने झेल सोडला. तर चेसने अक्षरच्या सहाव्या षटकात २ चौकार मारले. यासह वेस्ट इंडिजने बिनबाद ४५ धावा केल्या आहेत.

19:26 (IST) 1 Mar 2026

IND vs WI Live: बुमराहच्या षटकात मोठी चूक

जसप्रीत बुमराहला सामन्यातील पाचवं षटक टाकण्यासाठी बोलावलं. बुमराहच्या षटकात चेसने स्कूप खेळत चौकार लगावला. यानंतर चेसने पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळला आणि चेंडू हवेत उंच उडाला. अभिषेक शर्माने झेल टिपला खरा पण त्याच्या हातातून चेंडू सुटला आणि कॅच ड्रॉप झाला. याचा सामन्यात पुढे भारताला किती फटका बसणार यावर सर्वांच्या नजरा असतील.

19:13 (IST) 1 Mar 2026

WI vs IND Live: हार्दिकच्या षटकार चौकार-षटकार

हार्दिक पंड्याच्या षटकात शे होपने पहिले तिन्ही डॉट चेंडू खेळले. त्यानंतर षटकार आणि चौकार लगावत या षटकात १० धावा कुटल्या. यासह २ षटकांत विडिंजने १३ धावा केल्या.

19:03 (IST) 1 Mar 2026

WI vs IND Live: सामन्यााला सुरूवात

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अटीतटीच्या सामन्याला सुरूवात झाली आहे. वेस्ट इंडिजकडून शे होप व रोस्टन चेसची जोडी मैदानावर उतरली आहे. तर अर्शदीप सिंगने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.

18:55 (IST) 1 Mar 2026

IND vs WI Live: राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानावर उतरले आहेत. सुरूवातीला वेस्ट इंडिज त्यानंतर भारताचं राष्ट्रगीत होईल.

18:51 (IST) 1 Mar 2026

West Indies Playing 11: वेस्ट इंडिजची प्लेईंग इलेव्हन

शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकिल हुसेन, गुडाकेश मोती, शामर जोसेफ

18:37 (IST) 1 Mar 2026

India Playing 11: भारताची वेस्ट इंडिजविरूद्ध प्लेईंग इलेव्हन

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह</p>

18:34 (IST) 1 Mar 2026
IND vs WI Toss: नाणेफेक

टी-२० विश्वचषक २०२६ सुपर-८ मधील भारत आणि वेस्ट इंडिज सामन्याची नाणेफेक टीम इंडियाने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर वेस्ट इंडिजचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. भारतीय संघ गेल्या सामन्यातील सारख्याच प्लेईंग इलेव्हनसह उतरणार आहे. तर वेस्ट इंडिजच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला असून अकिल हुसैन संघात परतला आहे.

18:22 (IST) 1 Mar 2026

IND vs WI Live: हेटमायरला रोखणं मोठं आव्हान

वेस्ट इंडिज स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर वादळी फॉर्मात आहे. हेटमायरच्या फटकेबाजीच्या बळावर वेस्ट इंडिज संघाने मोठ्या धावसंख्या उभारल्या आहेत. त्यामुळे त्याला लवकक बाद करणं हे संघासमोर मोठं आव्हान असेल.

India vs West Indies Live Match Score Today, ICC T20 World Cup 2026: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 विश्वचषकातील नॉकआऊट सामना खेळवला जाणार आहे. विजेता संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरेल.