रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून टीम इंडियामध्ये एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळत आहे. सर्व खेळाडू सामन्यादरम्यान चेष्टा-मस्तरी करताना दिसतात. रोहित शर्मा स्वतः या सामन्यात आपल्या खेळाडूंना गतमीशीर पद्धतीने ट्रोल करतो. वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात असेच काहीसे घडले.

या सामन्यात रोहित शर्माने लेगस्पिनर यजुर्वेंद्र चहलला पुन्हा एकदा ट्रोल केले. रोहित शर्माने चहलला दात न दाखवण्यास सांगितले. रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनाही तो खूप आवडला आहे.

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
a girl cleaning shaved by sitting in salon
अरे देवा! सलुनमध्ये बसून चक्क दाढी करत होती तरुणी, VIDEO पाहून तुम्हीही चक्रावून जाल
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: “अरे २ ओव्हरमध्ये २४ धावा सहज होतील…” शशांक आणि आशुतोषने सांगितला किस्सा, शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं बोलणं, पाहा व्हीडिओ
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

हेही वाचा – IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर मुंबईविरुद्ध खेळणार; ‘वर्धा एक्सप्रेस’ सुसाट धावणार!

चहल वेस्ट इंडीजच्या डावातील १५वे षटक करत होता. पहिल्याच चेंडूवर चहलने आपल्या फिरकीने पोलार्डला अडचणीत आणले. पोलार्डला एक धाव मिळाली आणि तो नॉन स्ट्राइककडे आला. जिथे त्याला पाहून चहल हसायला लागला. यानंतर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार रोहित शर्माने चहलला दात न दाखवता पटकन गोलंदाजी करण्यास सांगितले. स्टम्प माइकवर रोहितचे हे बोलणे ऐकू गेले आणि आता तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने टी-२० मालिकेतही विजयाने सुरुवात केली. कोलकातामध्ये प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत १५७ धावा केल्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने लक्ष्य ७ चेंडू राखून पूर्ण केले. भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माने अवघ्या १९ चेंडूत ४० धावा केल्या. इशान किशननेही ३५ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने १८ चेंडूत नाबाद ३४ धावांची खेळी केली. व्यंकटेश अय्यरनेही १३ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. टी-२० मालिकेतील पुढील सामना शुक्रवारी होणार आहे.