अहमदाबादमध्ये पार पडलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. भारताचा हा १०००वा वनडे सामना होता. या ऐतिहासिक विजयासह रोहितने आपल्या कप्तानपदाच्या युगाला प्रारंभ केला. इतका मोठा विजय मिळवल्यानंतरही रोहित समाधानी नव्हता, त्याने सामन्यानंतर प्रतिक्रिया देत याबाबत स्पष्टीकरण दिले.

रोहित शर्माने आपल्या खेळाडूंना नाविन्यपूर्ण काम करण्याचे आवाहन केले. सामन्यानंतर रोहित म्हणाला, ”एक संघ म्हणून आम्हाला उत्तम व्हायचे आहे. संघाला जे हवे आहे ते साध्य करणे हे अंतिम ध्येय आहे. जर संघाला आमच्याकडून काही वेगळे करायचे असेल, तर आम्हाला ते करावे लागेल. आपण खूप बदलले पाहिजेत असे समजू नका. मी खेळाडूंना स्वतःला आव्हान देत राहण्यास सांगत आहे. त्यांनी नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून गरज पडेल तेव्हा खेळाडू त्यासाठी तयार होतील.”

Jos Buttler's record-breaking century
KKR vs RR : जोस बटलरचं धोनी-कोहलीबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, “ते दोघे ज्या प्रकारे शेवटपर्यंत…”
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: १२ वर्षांनी शतक तरीही सेलिब्रेशन नाही, रोहित शर्माचा सामन्यानंतरचा व्हीडिओ चाहत्यांना करतोय भावुक
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: केकेआरविरूद्धच्या मोठ्या पराभवानंतर ऋषभ पंतला ठोठावला २४ लाखांचा दंड, तर इतर खेळाडूंवरही कारवाई

हेही वाचा – U19 WC : अर्रर्र..! शाहिद कपूरनं केली ‘मोठी’ चूक; टीम इंडियाचं अभिनंदन करायला गेला अन्..!

रोहित म्हणाला, ”माझा ‘परफेक्ट’ खेळावर विश्वास नाही. तुम्ही ‘परिपूर्ण’ होऊ शकत नाही. पण सगळ्यांनी छान काम केले. आम्ही सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. मला याचा खूप आनंद झाला आहे. फलंदाजी करताना, आम्ही लक्ष्याचा पाठलाग करताना जास्त विकेट गमावू नयेत, ही पहिली गोष्ट आहे. आणि गोलंदाजी करताना आम्ही त्यांच्या खालच्या ऑर्डरवर अधिक दबाव आणू शकलो असतो. मला त्यांच्याकडून श्रेय काढून घ्यायचे नाही. आम्ही सुरुवातीला आणि नंतर शेवटी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती चांगली होती.”

अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने १७६ धावा केल्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने ६ गडी राखून विजय मिळवला. एकेकाळी भारत मजबूत स्थितीत होता, पण कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली, इशान किशन, ऋषभ पंत पटापट तंबूत परतले.