IND vs WI 3rd T20 News in Marathi, 01 August 2022 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (२ ऑगस्ट) रोजी सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे झाला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा सात गडी राखून पराभव केला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यजमान वेस्ट इंडीजला सुरुवातीला फलंदाजी करावी लागली. निर्धारित २० षटकांमध्ये विंडीजने कायले मेयर्सच्या अर्धशतकाच्या बळावर पाच बाद १६४ धावा केल्या होत्या. भारताने १९ षटकांमध्ये तीन गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य पार केले.

IRE vs AFD 1st Test Match Updates in Marathi
IRE vs AFG : आयर्लंडचा पहिलावहिला कसोटी विजय; अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात
Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
ishan kishan & shreyas iyer
श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून का वगळण्यात आलं?
Live Updates

India vs West Indies 3rd T20 Live : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी २० सामन्यातील सर्व अपडेट्स

00:54 (IST) 3 Aug 2022
भारताचा तिसरा गडी बाद

भारताचा तिसरा गडी बाद झाला आहे. हार्दिक पंड्या चार धावा करून माघारी गेला.

00:39 (IST) 3 Aug 2022
सूर्यकुमार यादवचे शतक हुकले

सूर्यकुमार यादवच्या रुपात भारताचा दुसरा गडी बाद झाला आहे. त्याने ४४ चेंडूत ७६ धावा फटकावल्या.

00:23 (IST) 3 Aug 2022
भारताचा पहिला गडी बाद

श्रेयस अय्यरच्या रुपात भारताचा पहिला गडी बाद झाला आहे. भारताच्या ११.३ षटकांमध्ये एक बाद १०५ धावा झाल्या आहेत.

00:06 (IST) 3 Aug 2022
सूर्यकुमार यादवचे धडाकेबाज अर्धशतक

सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताच्या ९ षटकांमध्ये बिनबाद ८३ धावा झाल्या आहेत.

23:46 (IST) 2 Aug 2022
पाच षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ४९ धावा

पाच षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ४९ धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर डावाला आकार देत आहेत.

23:41 (IST) 2 Aug 2022
रोहितला दुखापत

कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

23:24 (IST) 2 Aug 2022
भारताची फलंदाजी सुरू

भारताच्या डावाला सुरुवात झाली असून सलामीवीर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर उपस्थित आहेत.

23:12 (IST) 2 Aug 2022
भारतासमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य

निर्धारित २० षटकांमध्ये विंडीजने कायले मेयर्सच्या अर्धशतकाच्या बळावर पाच बाद १६४ धावा केल्या आहेत.

22:58 (IST) 2 Aug 2022
१८ षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या तीन बाद १३७ धावा

१८ षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या तीन बाद १३७ धावा झाल्या आहेत.

22:49 (IST) 2 Aug 2022
वेस्ट इंडीजचा तिसरा गडी बाद

वेस्ट इंडीजचा तिसरा गडी बाद झाला आहे. कायले मेयर्स ५० चेंडूंत ७३ धावा करून बाद झाला. विंडीजच्या १६.२ षटकांमध्ये तीन बाद १२८ धावा झाल्या आहेत.

22:40 (IST) 2 Aug 2022
वेस्ट इंडीजचा दुसरा गडी बाद

निकोलस पूरनच्या रुपात वेस्ट इंडीजचा दुसरा गडी बाद झाला आहे. यजमानांच्या १५ षटकांमध्ये दोन बाद १०८ धावा झाल्या आहेत.

22:37 (IST) 2 Aug 2022
विंडीजचा धावफलक शंभरीपार

१५व्या षटकांमध्ये विंडीजचा धावफलक शंभरीपार गेला आहे. निकोलस पूरन आणि मेयर्स यांच्यात ५० धावांची भागीदारी झाली आहे.

22:28 (IST) 2 Aug 2022
कायले मेयर्सचे दमदार अर्धशतक

कायले मेयर्सने ३८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. १३ षटकांमध्ये विंडीजच्या एक बाद धावा ८४ झाल्या आहेत.

22:24 (IST) 2 Aug 2022
१२ षटकांमध्ये विंडीजच्या एक बाद ७७ धावा

१२ षटकांमध्ये विंडीजच्या एक बाद ७७ धावा झाल्या आहेत. मेयर्स अर्धशतकाच्या जवळ पोहचला आहे.

22:09 (IST) 2 Aug 2022
नऊ षटकांमध्ये विंडीजच्या एकबाद ६३ धावा

नऊ षटकांमध्ये विंडीजच्या एकबाद ६३ धावा झाल्या आहेत. सलामीवीर कायले मेयर्स दमदार फलंदाजी करत आहेत.

21:53 (IST) 2 Aug 2022
पाच षटकांमध्ये विंडीजच्या बिनबाद ४१ धावा

पाच षटकांमध्ये विंडीजच्या बिनबाद ४१ धावा झाल्या आहेत. लामीवीर ब्रँडन किंग आणि कायले मेयर्स डावाला आकार देत आहेत.

21:41 (IST) 2 Aug 2022
विंडीजची आक्रमक सुरुवात

विंडीजने आपल्या डावाची आक्रमक सुरुवात केली आहे. तीन षटकांमध्ये बिनबाद २२ धावा झाल्या आहेत.

21:31 (IST) 2 Aug 2022
वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला सुरुवात

वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला सुरुवात झाली असून सलामीवीर ब्रँडन किंग आणि कायले मेयर्स मैदानात उतरले आहेत.

21:12 (IST) 2 Aug 2022
वेस्ट इंडीजच्या संघात एक बदल

वेस्ट इंडीजचा संघ: कायले मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डेव्हॉन थॉमस (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, अकील होसेन, डोमिनिक ड्रेक्स, अल्झारी जोसेफ, ओबेड मॅकॉय.

21:09 (IST) 2 Aug 2022
रविंद्र जडेजाला विश्रांती

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग.

21:05 (IST) 2 Aug 2022
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.