भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथे खेळवला गेला. एकदिवसीय इतिहासातील हा भारतीय संघाचा १०००वा सामना होता. तसेच हा सामना रोहित शर्माचा नियमित कर्णधार म्हणून पहिलाच सामना आहे. विराट कोहली पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला. या सामन्यात भारताने विंडीजला ६ गड्यांनी मात दिली. कर्णधारपदावरून रोहित आणि विराटमध्ये वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आजच्या सामन्यात सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज मैदानावर रोहित आणि विराटबाबत एक उत्तम गोष्ट पाहायला मिळाली. वेस्ट इंडीजची फलंदाजी सुरू असताना २२व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर यजुर्वेंद्र चहल आणि इतर भारतीय खेळाडूंनी वेस्ट इंडिजच्या शमारह ब्रूक्सविरुद्ध जोरदार अपील केले. फलंदाजाच्या बॅटची बाहेरची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या हातात गेल्याचा दावा भारतीय खेळाडूंनी केला, पण अंपायरने आऊट दिला नाही.

यानंतर रोहित शर्माने डीआरएस घेण्याबाबत इतर सहकारी खेळाडूंचे मत जाणून घेतले. त्यानंतर विराट कोहलीही तिथे पोहोचला. रोहितने विचारले, ”क्या है, आउट है?” यावर विराट म्हणाला, ”मेरे हिसाब से आउट है.” यानंतर रोहितने काहीही विचार न करता रिव्ह्यू घेतला. ब्रूक्सच्या बॅटला लागल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे पंचांना आपला निर्णय बदलावा लागला आणि भारतीय संघाला विकेट मिळाली.

हेही वाचा – IND vs WI 1st ODI : टीम इंडियानं जिंकला ऐतिहासिक सामना; विंडीजला ६ गड्यांनी दिली मात!

या घटनेच्या दोन षटकांपूर्वी चहलने वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डला क्लीन बोल्ड केले. जगातील स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेला पोलार्ड पहिल्या चेंडूवर खाते न उघडताच बाद झाला. पोलार्ड बाद होताच रोहित आणि कोहली यांनी एकत्र आनंद साजरा केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून बरेच काही घडत आहे. कोहलीने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. यानंतर रोहित शर्माला टी-२०चा कर्णधार बनवण्यात आले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले. रोहित शर्माची वनडे कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi virat kohli helping rohit sharma to take the review adn
First published on: 06-02-2022 at 20:34 IST