India vs West Indies 1st T20I: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना लखनौतील एकाना स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरच्या फलंदाजीचं वादळ पाहायला मिळालं. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने २० षटकांअखेर १७१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार श्रेयस अय्यरने वादळी शतक झळकावलं आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
श्रेयस अय्यरचं दमदार अर्धशतक
या सामन्यात भारतीय संघ १७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. भारतीय संघाचा फलंदाजीक्रम पाहता, हे आव्हान भारतीय संघासाठी फार मोठं नव्हतं. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने पहिल्या विकेटसाठी २९ धावा जोडल्या. अभिषेक शर्मा २१ , तर संजू सॅमसन ११ धावा करून माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि इशान किशनच्या जोडीने महत्वपूर्ण भागीदारी केली आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
या दोन्ही फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यादरम्यान श्रेयस अय्यरने ४२ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. तर इशान किशनने नाबाद ३७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आणि भारतीय संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली.
वेस्ट इंडिजने केल्या १७१ धावा
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना सलामीला आलेल्या शे होपने ५२ धावांच खेळी केली. तर कमिल पूरन १२ धावांवर माघारी परतला. शिमरन हेटमायर ५, रोमन पॉवेल शून्यावर माघारी परतला. शेवटी शेरफेने रूदरफोर्डने तुफान फटकेबाजी केली. त्याने ५६ धावा कुटल्या. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार खेचले. या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने २० षटकांअखेर १७१ धावा केल्या.
