India vs Zimbabwe Highlights, T20 WC 2026 Super-8: भारताने टी-२० विश्वचषक सुपर-८ फेरीतील झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात अपेक्षित असा मोठ्या फरकाने विजय मिळवला. या विजयासह भारताच्या सेमीफायनलच्या आशा कायम आहेत. टीम इंडियाच्या फलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट फटकेबाजी करत २५६ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने कडवी झुंज देत २० षटकांत १८४ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने नाबाद ९७ धावांची खेळी केली. तर भारताकडून गोलंदाजीत अर्शदीपने ३ विकेट्स घेतल्या.

Live Updates

IND vs ZIM T20 World Cup 2026 Super-8 Highlights: भारत आणि झिम्बाब्वे सुपर-८मधील टी-२० विश्वचषक २०२६ सामन्याचे हायलाईट्स

22:34 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM Live: भारताचा झिम्बाब्वेवर मोठ्या फरकाने विजय

भारतीय संघाने झिम्बाब्वेविरूद्ध मोठा विजय मिळवत सेमीफायनलमधील आपलं अस्तित्व कायम ठेवलं आहे. टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर ७६ धावांनी मोठा विजय नेट रन रेटच्या हिशोबाने महत्त्वाचा ठरला. झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटने या सामन्यात उत्कृष्ट खेळी केली. बेनेटने या सामन्यात नाबाद ९७ धावांची खेळी केली. याशिवाय भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स मिळवल्या.

22:32 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM Live: दुबेच्या खिशात अखेरीस विकेट

शिवम दुबे सामन्यातील अखेरचं षटक टाकण्यासाठी आला आहे. त्याने दुसरा चेंडू नो बॉल टाकला, तर पुढचा चेंडू वाईड आणि लीगल चेंडूवर मुसेकिवाने षटकार खेचला. यानंतर पुढच्या चेंडूवर मुसेकिवाला त्याने झेलबाद केलं. संजू सॅमसनने कमालीचा झेल टिपला.

22:23 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM Live: अर्शदीपने मुनायोंगाला केलं क्लीन बोल्ड

अर्शदीप सिंगने १९व्या षटकात मुनायोंगाला क्लीन बोल्ड करत सामन्यातील तिसरी विकेट मिळवली. झिम्बाब्वेला विजयासाठी १० चेंडूत ९५ धावांचं अशक्यप्राय समीकरण आहे.

22:12 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM Live: अर्शदीपच्या एका षटकात दोन विकेट्स

अर्शदीप सिंग १७वं षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने ७२ धावांची भागीदारी तोडत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळताना सिकंदर रझा ३१ धावा करत झेलबाद झाला. यानंतर चौथ्या चेंडूवर रायन बर्लला त्याने पायचीत करत संघाला अजून एक विकेट मिळवून दिली.

22:08 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM Live: ब्रायन बेनेटची फटकेबाजी

ब्रायन बेनेट एकटाच टीम इंडियाला भारी पडत आहे. ब्रेनेट अक्षरच्या षटकात १९ धावा कुटल्या. त्यानंतर बुमराहच्या षटकातही त्याने चौकार-षटकार खेचले आहेत. तर शिवम दुबेच्या १५व्या षटकात त्याने तब्बल २६ धावा कुटल्या. यासह ब्रेनेट ४८ चेंडूत ७८ धावांवर खेळत आहे. तर झिम्बाब्वेने १५ षटकांत २ बाग १३१ धावा केल्या आहेत.

22:01 (IST) 26 Feb 2026
Brain Benett Fifty: ब्रायन बेनेटचं अर्धशतक आणि फटकेबाजी

झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेटने चौकार, षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या बेनेटने आणखी फटके लगावत चाहत्यांची मनं जिंकली.

21:42 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM Live: वरूणच्या खात्यात पहिली विकेट

वरूण चक्रवर्तीने १०व्या षटकात संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. वरूणच्या षटकात मेयर्स मोठा फटका खेळायला गेला, पण चेंडू हवेत उंच उडाला आणि तिलक वर्माने एक शानदार झेल टिपला.

21:42 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM Live: ब्रायन बेनेटची वादळी फटकेबाजी

अक्षर पटेलच्या नवव्या षटकात ब्रायन बेनेटने १९ धावा कुटल्या. त्याने एक चौकार व २ षटकार खेचले. यासगह ९ षटकांत संघाने १ बाद ७० धावा केल्या आहेत.

21:31 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM Live: अक्षर पटेलने संघाला मिळवून दिला ब्रेकथ्रू

अक्षर पटेल सातवं षटक टाकण्यासाठी आला आणि षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याने संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. अक्षरच्या चेंडूवर मारूमणी फटका मारायला गेला, पण इशानने सोपा झेल टिपत संघाला विकेट मिळवून दिली.

21:27 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM Live: रिंकू सिंहकडून झेल सुटला

ब्रायन बेनेट व तादिवानाशे मारूमणी यांनी सावध सुरूवातीनंतर चांगलीच फटकेबाजी केली आहे. बेनेटने बुमराहच्या षटकात दोन चौकार खेचले. यानंतर वरूणच्या पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात षटकार खेचला. यानंतर मारूमणी चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारायला गेला आणि चेंडू हवेत उंच उडाला. त्यानंतर रिंकू मागच्या दिशेने झेल टिपण्यासाठी गेला आणि चेंडू त्याच्या समोर पडला. यासह रिंकूने पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये कॅच ड्रॉप केला. हे दृश्य पाहून सर्वच जण चकित झाले. यासह झिम्बाब्वेने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ४४ धावा केल्या आहेत.

रिंकू सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानावर आला आहे. रिंकू सिंहचे वडील कॅन्सरशी झुंज देत असून त्याची तब्येत अचानक बिघडल्याने तो माघारी गेला होता. पण सामन्यापूर्वी संघात परतला.

21:05 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM Live: रनचेसला सुरूवात

भारताने दिलेल्या २५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेट व मारूमणी हो जोडी उतरली आहे. तर भारताकडून अर्शदीपने गोलंदाजीला सुरूवात केली.

20:49 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM Live: वर्ल्ड रेकॉर्ड होता होता राहिला

भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड अवघ्या ४ धावांनी हुकला. टी-२० वर्ल्डकपमधील सर्वात मोठी धावसंख्या श्रीलंकेने २००७च्या टी-२० विश्वचषकात केली होती. श्रीलंकेने केन्याविरूद्ध २६० धावा केल्या होत्या. तर आता भारत झिम्बाब्वेविरूद्ध २५६ धावा करू शकला आहे. भारताच्या या मोठ्या धावसंख्येत सर्व फलंदाजांचं योगदान आहे. संजू सॅमसनने १५ चेंडूत २४ धावा केल्या, तर अभिषेक शर्मा ५५ धावा करत बाद झाला. तर इशान किशनने ३८ धावा, कर्णधार सूर्याने १३ चेंडूत ३३ धावा केल्या. हार्दिक पंड्याचं अर्धशतक तर तिलक वर्माने १६ चेंडूत ४४ धावा केल्या.

20:46 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM Live: भारताने उभारला धावांचा डोंगर

अखेरच्या षटकात ब्रॅड इव्हान्सने चांगली गोलंदाजी केली, पण अखेरच्या दोन चेंडूत हार्दिक पंड्याने २ षटकार लगावत आपलं २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर यासह टीम इंडियाने अखेरच्या षटकात १५ धावा करत टी-२० वर्ल्डकप इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताने २० षटकांत ४ बाद २५६ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने झिम्बाब्वेला विजयासाठी २५७ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे.

20:40 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM Live: हार्दिक-तिलकची फटकेबाजी

हार्दिक पंड्या व तिलक वर्माने अखेरच्या षटकांमध्ये झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. दोघांनी २० चेंडूत अर्धशतकी भागीदारी साकारली आहे. १९व्या षटकात दोघांनी मिळून २१ धावा कुटल्या.

20:38 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM Live: भारताने उभारली आपली सर्वात मोठी धावसंख्या

टीम इंडियाने टी-२० विश्वचषक इतिहासातील आपली सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. १८व्या षटकात तिलक व हार्दिकने १९ धावा कुटल्या आणि संघाला २२० धावांवर पोहोचवलं. ही टीम इंडियाची २० चेंडूत अर्धशतकी भागीदारी टी-२० वर्ल्डकपमधील मोठी धावसंख्या आहे. तर अजून २ षटकंदेखील शिल्लक आहेत. टीम इंडियाने टी-२० विश्वचषक इतिहासात सर्वात मोठी धावसंख्या २००७ मध्ये इंग्लंडविरूद्ध २१८ धावा करत उभारली होती.

20:34 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM Live: भारत २०० धावांच्या पलीकडे

भारतीय संघाने १७ षटकांत २०० धावांचा पल्ला पार केला आहे. हार्दिक २३ धावा आणि तिलक वर्मा ७ चेंडूत १७ धावांवर खेळत आहे. झिम्बाब्वेचा उत्कृष्ट गोलंदाज ब्लेसिंग मुजाराबानीच्या गोलंदाजीवरही टीम इंडियाने धुलाई केली आहे. यासह टीम इंडिया टी-२० विश्वचषकातील आपली सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने जात आहे. टीम इंडियाने टी-२० विश्वचषक इतिहासात सर्वात मोठी धावसंख्या २००७ मध्ये इंग्लंडविरूद्ध २१८ धावा करत उभारली होती.

20:22 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM Live: सूर्या दादा झेलबाद

सूर्यकुमार यादव १५ व्या षटकात नगरावाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळायला गेला, पण चेंडू बॅटच्या कडेला लागल्याने हवेत उंच उडाला आणि झलेबाद झाला. सूर्या या सामन्यात २५०च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत होता. यासह त्याने १३ चेंडूत ३ चौकार व २ षटकारासह ३३ धावा केल्या. यासह भारताने १५ षटकांत ४ बाद १७६ धावा केल्या आहेत.

20:16 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM: ०,०,०, १५ अन् ५०..., अभिषेक शर्मा इज बॅक! झिम्बाब्वेविरूद्ध अवघ्या इतक्या चेंडूत झळकावलं वादळी अर्धशतक

Abhishek Sharma Fifty: अभिषेक शर्माला अखेरीस टी-२० विश्वचषकात सूर गवसला आहे. यासह त्याने स्पर्धेतील आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. ...अधिक वाचा
20:08 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM Live: अभिषेक शर्मा परतला माघारी

अभिषेक शर्मा स्लोअर चेंडूवर झेलबाद होत माघारी परतला आहे. मापोसाच्या १३व्या षटकात त्याने विकेट गमावली. अभिषेकने ३० चेंडूत ४ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासह भारताने १३ षटकांत ३ बाद १७ धावा केल्या आहेत.

19:57 (IST) 26 Feb 2026

Ishan Kishan Wicket: इशान किशन बाद

सिकंदर रझाच्या ११व्या षटकात चौकार-षटकाराने सुरूवात केल्यानंतर कट शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ३८ धावांवर झेलबाद झाला. यासह ७२ धावांची भागीदारी तुटली. भारताने ११ षटकांत २ बाद १२५ धावा केल्या आहेत.

19:51 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM live: अभिषेक शर्माचं अर्धशतक

अभिषेक शर्माने २६ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. टी-२० विश्वचषकातील अभिषेकची ही सर्वात मोठी खेळी ठरली आणि पहिलं अर्धशतकही झालं.

19:49 (IST) 26 Feb 2026

ZIM vs IND Live: भारताच्या १०० धावा पूर्ण

भारतीय संघाने ९.१ षटकांत १०० धावांचा पल्ला गाठला आहे. इशान किशन व अभिषेक शर्मा या जोडीने अर्धशतकी खेळी साकारली आहे.

19:37 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM Live: पॉवरप्ले

भारताची टी-२० विश्वचषकाच्या पॉवरप्लेमध्ये दणक्यात सुरूवात झाली आहे. संजू बाद झाल्यानंतर इशानने अभिषेकला चांगली साथ दिली आहे. इशान व अभिषेकने १४ चेंडूत ३२ धावा केल्या आहेत. तर इशान १५ धावा व अभिषेक ३३धावांवर खेळत आहे. यासह संघाने पॉवरप्लेमध्ये १ बाद ८० धावांचा डोंगर उभारला आहे.

19:23 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM live: भारताला पहिला धक्का

दणक्यात सुरूवात केल्यानंतर भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. संजू सॅमसन चौथ्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला आहे. ब्लेसिंग मुजारबानीने संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. सॅमसन १५ चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह २४ धावा केल्या.

19:21 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM Live: अभिषेक-संजूची शानदार सुरूवात

अभिषेक शर्माने तिसऱ्या षटकात मपोसाच्या गोलंदाजीवर शानदार फटकेबाजी करत त्याला सूर गवसल्याचा डंका वाजवला. अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला,या विश्वचषकातील त्याचा पहिला षटकार आहे. तर संजू व अभिषेकने ३ षटकांत ४८ धावा केल्या आहेत.

19:07 (IST) 26 Feb 2026

IND vs ZIM Live: संजू सॅमसनची दणक्यात सुरूवात

अभिषेक शर्माबरोबर सलामीला उतरलेल्या संजू सॅमसनने षटकाराने सुरूवात केली आहे. संजूने सामन्यातील दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. यासह त्याने पहिल्या षटकात १३ धावा कुटल्या.

18:59 (IST) 26 Feb 2026
ZIM vs IND Live: सामन्याला सुरूवात

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली असून अभिषेक शर्मा व संजू सॅमसनची जोडी मैदानावर उतरली आहे. यासह इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर उतरणार आहे. तर झिम्बाब्वेकडून नगरावाने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.

18:43 (IST) 26 Feb 2026

Zimbabwe Playing XI: झिम्बाब्वे प्लेईंग इलेव्हन

तादिवानाशे मारुमणी (यष्टीरक्षक), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कर्णधार), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, टिनोटेंडा मापोसा, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नागरावा

18:40 (IST) 26 Feb 2026
India Playing 11: भारताची प्लेईंग इलेव्हन

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

18:35 (IST) 26 Feb 2026
IND vs ZIM Live: नाणेफेक

टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर-८ सामन्यातील भारत आणि झिम्बाब्वे सामन्याची नाणेफेक झिम्बाब्वे संघाने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. नाणेफेकीच्या निर्णयाने भारतीय संघ खूश असून टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार होती, असं कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे.

India vs Zimbabwe Highlights ICC T20 World Cup 2026: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील करो या मरो सामन्यात टीम इंडियाने अपेक्षित मोठा विजय मिळवला.