India vs Zimbabwe T20I Series Live Telecast Streaming Channel App: कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी दाखल झाला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडच्या निराशाजनक दौऱ्यांनंतर, भारतीय क्रिकेट संघ आता झिम्बाब्वेविरूद्ध टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा युवा संघ मैदानात उतरताना दिसेल. या दौऱ्यासाठी भारताचे प्रशिक्षक बदलले असून व्ही व्ही एस लक्ष्मण प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळतील. पण ही मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार जाणून घेऊया.

भारताच्या टी-२० संघात सर्वाधिक चर्चा होत असलेलं नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी. इंग्लंडविरुद्ध पदार्पण केल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. इंग्लंड मालिकेतील दोन डावांमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता त्याला झिम्बाब्वेविरुद्ध आपली क्षमता सिद्ध करावी लागेल. त्याचबरोबर, भारतीय संघही विजयासाठी उत्सुक आहे. ही मालिका कुठे लाईव्ह पाहता येईल, हे आपण जाणून घेऊया.

भारत-झिम्बाब्वे मालिका कोणत्या अॅपवर लाईव्ह पाहता येणार?

भारताच्या टी-२० मालिका आपण स्टार स्पोर्ट्स जिओ हॉटस्टार आणि सोनी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहत असतो. पण यावेळेस मात्र झिम्बाब्वेविरूद्धची मालिका या चॅनेलवर जिओ हॉटस्टार, सोनी लिव्ह अॅपवर पाहायला मिळणार नाही. तर टीव्ही चॅनेलवर या मालिकेचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी झी युनाईट8 स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. तर डी डी स्पोर्ट्स या चॅनेलवर मालिका मोफत पाहता येणार आहे. त्याशिवाय मोबाईलवर ही मालिका लाईव्ह पाहायची असेल तर फॅनकोड हा अॅप डाऊनलोड करावा लागणार आहे.

भारत आणि झिम्बाब्वे मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होतील. झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये हे तिन्ही सामने खेळवले जातील. पहिला सामना २३ जुलैला तर उर्वरित दोन सामने शनिवारी २५ जुलै व रविवार २६ जुलै रोजी खेळवले जातील.

झिम्बाब्वे टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंह, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, रवी बिश्नोई.

भारताविरूद्ध टी-२० मालिकेसाठी झिम्बाब्वेचा संघ:

सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, बेन करन, ब्रॅड इव्हान्स, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), टिनोटेंडा मापोसा, तादिवानाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायोन मायर्स, रिचर्ड नगारवा, न्युमैन न्यामुरी, मिल्टन शुंबा