IND vs AUS Women T20 World Cup 2024 Match Scorecard: भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला टी-२० विश्वचषक २०२४ मधील महत्त्वाचा गट सामना खेळवला जात आहे. भारताच्या उपांत्य फेरीच्या दृष्टीने हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर या सामन्यात भारताला विजय मिळवावा लागेल. पण या सामन्यापूर्वी भारताला दिलासा देणारी आणि ऑस्ट्रेलियासाठी धक्का देणारी एक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार ॲलिसा हिली शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारताविरुद्धच्या महिला टी-२० विश्वचषक २०२४ सामन्यातून बाहेर पडली आहे.
ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार एलिसा हिली भारताविरूद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही माहिती दिली आहे. दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असून या सामन्यापूर्वी कर्णधार संघाबाहेर जाणं, हा ऑस्ट्रेलियन महिला संघासाठी मोठा धक्का असणार आहे. हिलीच्या जागी ताहलिया मॅकग्रा या सामन्यात कर्णधार आहे. एलिसा हिली टीम बसमधून उतरताना कुबड्या घेऊन उतरताना दिसली, यानंतर मैदानावरही ती कुबड्या घेऊन चालत होती. या दुखापतीमुळे एलिसा भारताविरूद्ध सामन्यात खेळताना दिसणार नाही.
IND W vs AUS W Playing 11: भारत वि ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन
भारत:
शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका सिंग.
ऑस्ट्रेलिया:
बेथ मूनी (यष्टीरक्षक), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन.
हीदर ग्रॅहमचा संघात प्रवेश
भारताविरूद्धच्या मोठ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची खेळाडू टायला व्लामिनेक ही दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेबाहेर झाली आहे. ICC महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या इव्हेंट तांत्रिक समितीने ऑस्ट्रेलियन संघात टायला व्लेमिनेकच्या जागी अष्टपैलू हीदर ग्रॅहमचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच आगामी सामन्यांमध्ये टायला व्लेमिनेकची जागा हीदर ग्रॅहम घेईल. वेगवान गोलंदाज व्लामिनेकला शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या गट टप्प्यातील सामन्यात दुखापत झाली होती. पाकिस्तानच्या डावातील पहिले षटक क्षेत्ररक्षण करताना तिच्या खांद्याला दुखापत झाली.
हीदर ग्रॅहम २०२३ टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होती. त्याने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी १ वनडे आणि ५ टी-२० सामने खेळले आहेत. गेल्या महिन्यात तिने न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा टी-२० सामना खेळला होता.