scorecardresearch

Premium

IND W vs BAN W: एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने पदक केले निश्चित, उपांत्य फेरीत आठ विकेट्सने बांगलादेशला चारली धूळ

IND W vs BAN W Semi-Final 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला किमान रौप्य पदक निश्चित आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला.

IND W vs BAN W: Indian women's cricket team secure medal at Asian Games defeated Bangladesh by eight wickets in semi-final
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला किमान रौप्य पदक निश्चित आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Asian Games Cricket, IND W vs BAN W Semi-Final 2023 Highlights: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला किमान रौप्य पदक निश्चित आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने दोन गडी गमावून ५२ धावा केल्या. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात जर विजय मिळवला तर ते सुवर्ण पदकाचे मानकरी ठरतील फक्त ते पाकिस्तानला हरवतात की श्रीलंकेला हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारताने बांगलादेशचा पराभव केला

बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव करत भारताने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. या विजयासह भारतीय संघाने किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १७.५ षटकांत सर्व गडी गमावून ५१ धावा केल्या. केवळ कॅप्टन निगार सुलतानाला दुहेरी आकडा पार करता आला. त्याने १२ धावा केल्या होत्या. भारताकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. भारताने ८.२ षटकात दोन गडी गमावून ५२ धावा केल्या आणि सहज लक्ष्य गाठले. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने १५ चेंडूत सर्वाधिक नाबाद २० धावा केल्या. शफालीने १७ धावांचे योगदान दिले. आता अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना पाकिस्तान किंवा श्रीलंकेशी होणार आहे.

Asian Games 2023 Updates
Asian Games: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पटकावले सुवर्णपदक, अफगाणिस्तानला खराब रॅकिंगचा बसला फटका
India's milestone of 100 medals complete in 19th Asian Games 2023
Asian Games: भारतीय महिला कबड्डी संघाची सुवर्ण कामगिरी, टीम इंडियाने पूर्ण केले पदकांचे शतक
Asian Games 2023: Indian hockey team gave a crushing defeat to Singapore registered a spectacular victory of 16-1
Asian Games, Hockey: चक दे इंडिया! हॉकीत भारतीय संघाचा दबदबा कायम, एक-दोन नव्हे पुन्हा १६ गोल करत सिंगापूरचा उडवला धुव्वा
Asian Games 2023: India's Asian Games challenge continues Sunil Chhetri's goal leads to emphatic 1-0 win over Bangladesh
Asian Games 2023, IND vs BAN: भारताचे एशियन गेम्समधील आव्हान कायम, छेत्रीच्या एका गोलमुळे बांगलादेशवर १-०ने दमदार विजय

बांगलादेशने ५१ धावा केल्या

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५१ धावा केल्या. संपूर्ण संघ १७.५ षटकांत ५१ धावांत गारद झाला. कर्णधार निगार सुलतानाने सर्वाधिक १२ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. नऊ धावा नाबाद राहिलेली नाहिदा अख्तर ही संघाची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तीतस साधू, अमनजोत कौर, राजेश्वरी गायकवाड आणि देविका वैद्य यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

हेही वाचा: Asian Games 2023, Hockey: चक डे इंडिया! भारतीय हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, उझबेकिस्तानवर १६-०ने मिळवला दणदणीत विजय

हरमनप्रीत कौर या सामन्यातही खेळली नाही

भारतीय महिला संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर बांगलादेशविरुद्धचा सामनाही खेळली नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतच तिच्या वर्तनामुळे तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या अर्थाने, हा तिचा दुसरा सामना असेल, ज्यामध्ये ती संघासोबत असेल, परंतु प्लेइंग-११ मध्ये नाही. हरमनप्रीतशिवाय भारतीय संघ हा सामना जिंकला असल्याने आता ती अंतिम सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध होईल.

हेही वाचा: Varanasi Kashi Vishwanath: सचिन, गावसकर, कपिल देव यांच्यासह ‘या’ दिग्गजांनी काशी विश्वनाथ मंदिराला दिली भेट; पाहा Video

दोन्ही संघातील प्लेईंग-११

बांगलादेश: निगार सुलताना (कर्णधार), मारुफा अख्तर, नाहिदा अख्तर, शोर्ना अख्तर, फहिमा खातून, सुलताना खातून, रितू मोनी, शोभना मोस्तारी, राबेया खान, शथी राणी, शमीमा सुलताना (विकेटकीपर).

भारत: स्मृती मंधांना (कर्णधार), अमनजोत कौर, शेफाली वर्मा, कनिका आहुजा, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, तीतास साधू, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind w vs ban w indian womens cricket team assured of a medal defeating bangladesh by eight wickets in the semi finals avw

First published on: 24-09-2023 at 14:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×