India w vs Bangladesh W, Womens Asia Cup: महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ गडी बाद १४९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला १०९ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना ४० जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Live Updates

India w vs Bangladesh: भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचे हायलाईट्स

23:16 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN Live: शफाली चमकली, हरमन-ऋचाने शेवट गाजवला; बांगलादेशला नमवत टीम इंडिया फायनलमध्ये

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ गडी बाद १४९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला १०९ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना ४० जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

22:46 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN: दीप्ती शर्माने दिला बांगलादेशला तिसरा मोठा धक्का! शोभना मोस्तारी परतली माघारी

बांगलादेशला तिसरा मोठा धक्का बसला आहे. शोभना मोस्तारी १८ धावांवर माघारी परतली आहे.

22:24 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN: बांगलादेशला दुसरा मोठा धक्का! दिलारा अख्तर परतली माघारी

बांगलादेशने चांगली सुरूवात केली होती. पण आता दुसरी फलंदाज बाद होऊन तंबूत परतली आहे. दिलारा अख्तर २१ धावांवर माघारी परतली आहे.

22:11 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN: बांगलादेशला पहिला मोठा धक्का! जुआइरिया फर्दूस स्वस्तात परतली माघारी

बांगलादेशला पहिला धक्का बसला आहे. जुआइरिया फर्दूस १४ धावांवर माघारी परतली आहे.

21:33 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN Live: शफालीची वादळी सुरूवात, हरमनप्रीत कौरचा दमदार शेवट! भारताने बांगलादेशसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर १४९ धावा केल्या आहेत. शफाली वर्माने ६४ धावांची खेळी करून दमदार सुरूवात करून दिली. तर शेवटी हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोषने मिळून संघाची धावसंख्या १४९ धावांवर पोहोचवली. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १५० धावांची गरज आहे.

21:20 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN: हरमनप्रीत - ऋचाची जोडी जमली! टीम इंडियाची १५० धावांच्या दिशेने वाटचाल

भारतीय संघाने १८ व्या षटकात १२७ धावा केल्या आहेत. भारतीय संघ १५० धावा करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

21:04 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN: शफाली वर्मा परतली माघारी! टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का

३ वेळा जीवदान मिळाल्यानंतर अखेर शफाली वर्मा बाद होऊन माघारी परतली आहे. शफालीने ६४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले.

20:56 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN: शफाली वर्माचं दमदार अर्धशतक! टीम इंडिया मजबूत स्थितीत

या सामन्यात डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या शफाली वर्माने ३५ चेंडूंचा सामना करत दमदार अर्धशतक झळकावलं आहे.

20:39 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN Live: भारतीय संघाला दुसरा धक्का! प्रतिका रावल परतली माघारी

भारतीय संघाला ५९ धावांवर दुसरा धक्का बसला आहे. प्रतिका रावल २० धावांवर बाद होऊन माघारी परतली आहे.

20:31 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN Live: भारतीय संघाची दमदार सुरूवात! शफाली- प्रतिकाची जोडी जमली

भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. पण शफाली आणि प्रतिकाने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला आहे. भारतीय संघाने ८ व्या षटकात ५० धावांचा पल्ला गाठला आहे.

20:11 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN: टीम इंडियाला पहिला मोठा धक्का! स्मृती मानधना स्वस्तात परतली माघारी

टीम इंडियाला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. स्मृती मानधना अवघ्या २ धावा करून माघारी परतली आहे.

20:10 (IST) 10 Sep 2026

IND vs AFG: शफाली वर्मा थोडक्यात बचावली

शफाली वर्मा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखली जाते. ती दुसऱ्याच षटकात बाद झाली असती. पण वैयक्तिक ७ धावसंख्येवर तिचा झेल सुटला.

19:48 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN: प्लेईंग ११

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११

भारत महिला (प्लेइंग XI): शफाली वर्मा, स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमली, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा

बांगलादेश महिला (प्लेइंग XI): दिलारा अख्तर, जुआइरिया फर्दूस, शोभना मोस्तारी, निगार सुलताना (यष्टीरक्षक/कर्णधार), शर्मिन अख्तर, शोर्ना अख्तर, फहिमा खातून, नाहिदा अख्तर, राबेया खान, सुलताना खातून, मारुफा अख्तर

19:47 (IST) 10 Sep 2026

IND vs BAN: नाणेफेक

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

India vs Pakistan Womens Asia Cup T20 | Harmanpreet Kaur Smriti Mandhana | India Womens Cricket Team Dubai | IND W vs PAK W T20 Head to Head

India w vs Bangladesh:  भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचे हायलाईट्स