scorecardresearch

Premium

INDW vs ENGW T20 T20 WC: रेणुका ठाकूरचे पंचक! धारदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने टीम इंडियासमोर ठेवले १५२ धावांचे आव्हान

IndiaW vs EnglandW T20 World Cup: महिलांच्या टी२० विश्वचषकातील भारत-इंग्लंड यांच्यात सामना होत असून इंग्लंडने पहिले फलंदाजी करताना भारतासमोर १५२ धावांचे मोठे लक्ष ठेवले आहे. रेणुका ठाकूरने शानदार गोलंदाजी केली.

IND W vs ENG W T20 WC: India got a target of 152 runs Renuka Singh took five wickets Natalie Skiver's half-century
सौजन्य- आयसीसी (ट्विटर)

IndiaW vs EnglandW T20 World Cup Match Today, 18 February 2023: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (१८ फेब्रुवारी) भारताचा सामना इंग्लंडशी होत आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १५१ धावा करत भारतासमोर १५२ धावांचे आव्हान ठेवले आहे. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत रेणुका सिंग ठाकूरने पाच विकेट्स घेत जबरदस्त गोलंदाजी केली.

रेणुका सिंह ठाकूरने भारतासाठी अत्यंत जबरदस्त गोलंदाजी करत चार षटकात १५ धावा देत पाच विकेट्स घेतले. इंग्लंडकडून अनुभवी फलंदाज नताली स्कायव्हरने सर्वाधिक ५० धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज अ‍ॅमी जोन्सने २७ चेंडूत ४० धावांची दमदार खेळी केली. कर्णधार हीदर नाइटने २३ चेंडूत २८ धावा केल्या. सोफी एक्लेस्टोन आठ चेंडूत ११ धावा करून नाबाद राहिली. डॅनियल यट आणि कॅथरीन स्क्रिव्हर यांना खातेही उघडता आले नाही. अ‍ॅलिस कॅप्सीने तीन धावा केल्या. भारताकडून रेणुका व्यतिरिक्त शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळाले.

PAK vs NED Match Updates in Cricket World Cup 2023
World Cup 2023, PAK vs NED: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांची दमछाक, नेदरलँडसमोर ठेवले २८७ धावांचे लक्ष्य
Suryakumar Yadav has a game that creates fear among his opponents Virender Sehwag big statement
Virender Sehwag: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘मिस्टर ३६०’ने केलेल्या अर्धशतकावर सेहवागचे सूचक विधान; म्हणाला, “सूर्यकुमारची फलंदाजी…”
IND vs AUS 1st ODI: Shreyas Iyer who returned from injury in the first match of the series dropped David Warner's catch
IND vs AUS 1st ODI: श्रेयस अय्यरने सोडलेला झेल टीम इंडियाला पडला महागात, डेव्हिड वॉर्नरचे शानदार अर्धशतक
IND vs AUS 1st ODI: India win the toss and decide to bowl Ashwin-Shreyas Iyer return to the squad see playing 11
IND vs AUS 1st ODI: भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; अश्विन-श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन, पाहा प्लेईंग-११

टीम इंडियाची नजर या स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयावर आहे. हरमनप्रीतच्या संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. भारत दोन सामन्यांत चार गुणांसह गटात दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडनेही दोन सामन्यांत दोन सामने जिंकले आहेत. चांगल्या रनरेटमुळे ते पहिल्या स्थानावर आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यास भारताची उपांत्य फेरीसाठी दावेदारी अधिक भक्कम होईल.

इंग्लंडविरुद्ध भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार शफाली वर्माला चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठय़ा धावसंख्येत करता आलेले नाही. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या स्मृती मंधानाने खेळपट्टीवर वेळ घालवणे गरजेचे आहे. जेमिमाह रॉड्रिग्जला कामगिरीत सातत्य राखावे लागेल. तर कर्णधार हरमनप्रीत कौरलाही लवकरच लय मिळवावी लागेल.

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: श्रेयस अय्यरची सव्याज परतफेड! ख्वाजाच्या विकेटने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान फलंदाजीला ब्रेक, पाहा Video

आजच्या सामन्यातील दोन्ही संघाची प्लेईंग ११

इंग्लंड: सोफिया डंकले, डॅनिएल येट, एलिस कॅप्सी, नताली सायव्हर, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), कॅथरीन सायव्हर, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल.

भारत: शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), शिखा पांडे, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind w vs eng w t20 wc india got a target of 152 runs renuka singh took five wickets natalie skivers half century avw

First published on: 18-02-2023 at 20:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×