India Women (IND-W) vs Sri Lanka Women (SL-W) 4th T20I Highlights: भारतीय संघाने २२१ धावांचा डोंगर उभारला. स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा ओलांडणारी ती केवळ चौथी फलंदाज आहे. स्मृती-शफाली जोडीने १६२ धावांची खणखणीत सलामी दिली. स्मृतीने ४८ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८० धावा केल्या. शफालीने ४६ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकारासह ७९ धावा केल्या. ऋचा घोषने १६ चेंडूत ४० धावा केल्या.

श्रीलंकेने कर्णधार चामरी अट्टापट्टूच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १९१ धावांची मजल मारली. पहिल्या तीन लढतींच्या तुलनेत श्रीलंकेच्या फलंदाजांची कामगिरी सुधारली. भारतातर्फे अरुंधती रेड्डी आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. पाचवा आणि अंतिम सामना मंगळवारी होणार आहे.

Live Updates

India Squad for Women's world cup

भारत विरुद्ध श्रीलंका चौथा टी२० सामना हायलाईट्स

22:37 (IST) 28 Dec 2025

भारताचं चले चलो

भारतीय संघाने २२१ धावांचा डोंगर उभारला. स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा ओलांडणारी ती केवळ चौथी फलंदाज आहे. स्मृती-शफाली जोडीने १६२ धावांची खणखणीत सलामी दिली. स्मृतीने ४८ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८० धावा केल्या. शफालीने ४६ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकारासह ७९ धावा केल्या. ऋचा घोषने १६ चेंडूत ४० धावा केल्या.

श्रीलंकेने कर्णधार चामरी अट्टापट्टूच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १९१ धावांची मजल मारली. पहिल्या तीन लढतींच्या तुलनेत श्रीलंकेच्या फलंदाजांची कामगिरी सुधारली. भारतातर्फे अरुंधती रेड्डी आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. पाचवा आणि अंतिम सामना मंगळवारी होणार आहे.

22:13 (IST) 28 Dec 2025

टीम इंडिया विजयी

भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या बळावर श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी२० लढतीत विजय मिळवला.

22:08 (IST) 28 Dec 2025

श्रीलंका पराभवाच्या दिशेने

भारतीय क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या ढिसाळ क्षेत्ररक्षणानंतरही श्रीलंकेला लक्ष्य गाठणं अवघड आहे.

21:44 (IST) 28 Dec 2025

श्रीलंकेची गती मंदावली

वेगवान सलामीनंतर श्रीलंकेची धावगती मंदावली आहे. त्यांनी दोन विकेट्सही गमावल्या आहेत. कर्णधार चामरी अट्टापट्टू ३७ चेंडूत ५२ धावा करुन तंबूत परतली आहे.

21:32 (IST) 28 Dec 2025
IND vs SL Live Score: श्रीलंकेच्या १०० धावा पूर्ण

श्रीलंकेने धावांचा पाठलाग करताना ११ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे.

20:54 (IST) 28 Dec 2025

श्रीलंकेचीही जोरदार सुरुवात

डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने आक्रमक सुरुवात केली आहे.

20:32 (IST) 28 Dec 2025

टीम इंडिया २२१

स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या दमदार खेळींच्या बळावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात २२१ धावांचा डोंगर रचला. स्मृतीने ४८ चेंडूत ८० तर शफालीने ४६ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. ऋचा घोषने या पायावर कळस चढवत १६ चेंडूत ४० धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने १० चेंडूत १६ धावा केल्या.

20:25 (IST) 28 Dec 2025

ऋचा घोषने एका षटकात चोपल्या २३ धावा

ऋचा घोषने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत एका षटकात २३ धावा कुटल्या.

20:13 (IST) 28 Dec 2025

शफालीपाठोपाठ स्मृतीही तंबूत; शतकाचं स्वप्न भंगलं

शफालीबरोबरीची भागीदारी संपुष्टात येताच स्मृती मानधनाही बाद झाली आहे. स्मृतीने ४८ चेंडूत ८० धावांची खेळी केली.

20:07 (IST) 28 Dec 2025

शफालीचा झंझावात थांबला

४६ चेंडूत ७९ धावांची वेगवान खेळी करून शफाली वर्मा बाद झाली. या खेळीत १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

20:02 (IST) 28 Dec 2025

टीम इंडिया दीडशेपल्याड

स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या वादळी खेळींच्या बळावर भारतीय संघाने दीडशेचा टप्पा ओलांडला.

19:53 (IST) 28 Dec 2025

स्मृती मानधनाचं अर्धशतक, आता सर्वाधिक षटकारांचा विक्रमही नावावर

स्मृती मानधनाने ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. भारतासाठी सर्वाधिक षटकारांचा विक्रमही तिने नावावर केला.

19:45 (IST) 28 Dec 2025

टीम इंडियाची शंभरी, शफालीने पार केला अर्धशतकाचा टप्पा

शफाली वर्माच्या तडाखेबंद फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने ११व्या षटकातच शंभरीचा टप्पा ओलांडला आहे.

19:40 (IST) 28 Dec 2025

१०,००० धावांचा टप्पा कमीत कमी डावात

स्मृती मानधनाने सगळ्यात कमी इनिंग्ज अर्थात डावांमध्ये २८१ मध्ये १०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला.

19:30 (IST) 28 Dec 2025

स्मृती मानधना दस हजारी मनसबदार

स्मृती मानधनाने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी२० लढतीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. हा विक्रम करणारी ती केवळ चौथी खेळाडू आहे. मिताली राज, चार्लोट एडवर्ड्स, सुजी बेट्स यांच्या मांदियाळीत आता स्मृतीचा समावेश झाला आहे.

19:24 (IST) 28 Dec 2025

शफाली वर्माची चौकारांची आतषबाजी

दोन लढतीत श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेणाऱ्या शफाली वर्माने चौथ्या लढतीतही फॉर्म कायम राखत चौकारांची लयलूट केली.

19:06 (IST) 28 Dec 2025

पहिल्याच ओव्हरमध्ये १० धावा

स्मृती मानधनाने पहिल्याच ओव्हरमध्ये २ चौैकार लगावत भारतीय संघाला सकारात्मक सुरुवात करून दिली.

18:56 (IST) 28 Dec 2025

श्रीलंकेचा कर्णधार चामरी अट्टापट्टूचा दीडशेवा टी२० सामना

श्रीलंकेची कर्णधार चामरी अट्टापट्टू १५०वा टी२० सामना खेळत आहे. श्रीलंकेने माल्की मादरा आणि इनोका रनवीरा यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. काव्या काविंदी आणि रश्मिका यांना अंतिम अकरात जागा मिळाली आहे.

श्रीलंकेचा संघ- चामरी अट्टापट्टू, हसिनी परेरा, हर्षिता समराविक्रमा, कविशा दिलहारी, निल्हाशिका सिल्व्हा, इमेशा दुलानी, कौशिनी नुत्यांगना, मलाशा स्नेहानी, रश्मिका सेवांदी, काव्या काविंदी, निमाशा मीपगे.

18:46 (IST) 28 Dec 2025

भारतीय संघात दोन बदल- जेमिमा, क्रांतीऐवजी अरुंधती रेड्डी आणि हरलीन देओल

तब्येत ठीक नसल्यामुळे जेमिमा रॉड्रिग्ज या लढतीत खेळत नाहीये तर क्रांती गौडला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी अरुंधती रेड्डी आणि हरलीन देओल यांना अंतिम अकरात स्थान देण्यात आलं आहे.

भारतीय संघ- शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, दीप्ती शर्मा, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, वैष्णवी शर्मा, श्री चरणी

18:32 (IST) 28 Dec 2025

श्रीलंकेने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय

चौथ्या टी२० लढतीत श्रीलंकेची कर्णधार चामरी अट्टापट्टूने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

18:29 (IST) 28 Dec 2025

तिसऱ्या लढतीसह टीम इंडियाने जिंकली मालिका

तिसऱ्या लढतीत श्रीलंकेचा डाव एकदमच गडबडला. त्यांना ११२ धावाच करता आल्या. रेणुका सिंगने २१ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स पटकावल्या. दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेत रेणुकाला चांगली साथ दिली. शफालीने पुन्हा एकदा तडाखेबंद खेळी साकारली. तिने ४२ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७९ धावांची खेळी केली. या विजयासह भारतीय संघाने मालिका जिंकली.

18:11 (IST) 28 Dec 2025

शफालीचा दणका श्रीलंकेला भारी

दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी १२८ धावांची मजल मारली. हर्षिता समराविक्रमाने ३३ तर कर्णधार चामरी अट्टापट्टून ३१ धावा केल्या. बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारतातर्फे वैष्णवी शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. शफाली वर्माने ३४ चेंडूत नाबाद ६९ धावांची दिमाखदार खेळी साकारली. यामध्ये ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. जेमिमा रॉड्रिग्जने २६ धावांची खेळी करत तिला चांगली साथ दिली.

17:58 (IST) 28 Dec 2025

भारताच्या विजयात जेमिमा चमकली

पहिल्या लढतीत श्रीलंकेला १२१ धावाच करता आल्या. विश्मी गुणरत्नेने ३९ धावा केल्या. भारतीय संघाने जेमिमा रॉड्रिग्जच्या ४४ चेंडूत ६९ धावांच्या खेळीच्या बळावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. जेमिमाच्या खेळीत १० चौकारांचा समावेश होता.

17:43 (IST) 28 Dec 2025

आज चौथी लढत

भारत आणि श्रीलंका महिला संघांदरम्यान आज चौथा टी२० सामना तिरुवनंतपुरम इथे होत आहे.

IND-W vs SL-W Live Cricket Score, India Women vs Sri Lanka Women 4th T20I Today Match - Highlights | भारत विरुद्ध श्रीलंका चौथा टी२० सामना हायलाईट्स