डावखुरा सलामीवीर क्विंटन डीकॉकच्या (१३० चेंडूंत १२४ धावा) दिमाखदार शतकानंतरही भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेला २८७ धावांत रोखले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केप टाऊन येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने या सामन्यासाठी संघात चार बदल करताना दीपक चहर आणि प्रसिध कृष्णा या वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटू जयंत यादव आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांना संधी दिली. चहरने या संधीचा चांगला उपयोग करताना आफ्रिकेचा सलामीवीर जानेमन मलान (१) आणि एडीन मार्करम (१५) यांना माघारी पाठवले. तसेच कर्णधार टेम्बा बव्हूमा (८) धावचीत झाल्याने आफ्रिकेची ३ बाद ७० अशी स्थिती झाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India africa odi series india beat africa by 287 runs akp
First published on: 24-01-2022 at 10:02 IST