वृत्तसंस्था, पॅरिस

टोक्यो ऑलिम्पिकमधील सात पदकांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता पॅरिस येथे होणाऱ्या स्पर्धांत दुहेरी आकडा गाठण्याचे उद्दिष्ट भारतीय पथकाने डोळ्यासमोर ठेवले आहे.

chess olympiad india strongest team in budapest to win gold medal
सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
sarva karyeshu sarvada sane guruji rashtriy smarak trust information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : युवकांना घडवण्याचा उपक्रम, विस्तारासाठी मदत आवश्यक
Paralympic gold medal Praveen Kumar Paralympics sport news
हार न मानण्याची प्रवृत्ती हीच प्रवीणची ताकद
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Kaustubh Pandharipande faces a big challenge of kidney disease
नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान
How did Indian mango reach China and Pakistan?; India and China face off over mangoes
India-China mango history:आंबा भारताचा, श्रेय घेतंय पाकिस्तान आणि उत्पादनात अग्रेसर चीन; भारतीय आंबा व्हाया पाकिस्तान चीनमध्ये पोहोचलाच कसा?

भारतीय संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासातील आपले सर्वांत मोठे, ११७ खेळाडूंचे पथक यंदा पॅरिसला पाठवले आहे. ते १६ क्रीडा प्रकारांत सहभाग नोंदवतील. त्यामुळे साहजिकच भारतीय खेळाडूंकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा जात आहे. या अपेक्षांचे मोठे ओझे घेऊनच भारतीय खेळाडू ऑलिम्पिकच्या मैदानात उतरणार आहेत. दोन वर्षांच्या अंतर्गत कलहामुळे केवळ भारतीय कुस्तीगीर वगळता अन्य सर्व खेळाडू आवश्यक सरावासह पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक अपेक्षा भालाफेकपटू नीरज चोप्राकडूनच बाळगल्या जात आहेत. अॅथलेटिक्समध्ये २९ सदस्यांचे, नेमबाजीत २१, हॉकीमध्ये १९ सदस्यीय पथक असून, यातील एकूण ६९ खेळाडूंपैकी ४० खेळाडू नवोदित असतील.

हेही वाचा >>>Olympics Opening Ceremony Parade Order: नदीवर होणार उद्घाटन सोहळा, परेडमध्ये नेहमी ग्रीसचे खेळाडू पहिले का? भारत कितव्या क्रमांकावर? वाचा सविस्तर

भारतीय खेळाडू आपल्या वैयक्तिक कौशल्याच्या जोरावर देशाची मान उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधू, टेनिसपटू रोहन बोपण्णा, टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमल, हॉकी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश या नामांकित खेळाडूंची ही अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा ठरण्याची दाट शक्यता आहे. हॉकी संघाची लय फारशी चांगली नाही, बॉक्सिंगपटूंच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. कुस्तीपटूंना पुरेसा सराव मिळालेला नाही. मात्र, त्यानंतरही यंदा भारतीय खेळाडू पदकांचा दुहेरी आकडा गाठण्याचे उद्दिष्ट बाळगून आहेत.

अॅथलेटिक्समध्ये नीरज चोप्राखेरीज स्टीपलचेसपटू अविनाश साबळेकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. अविनाशनने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये आपलाच राष्ट्रीय विक्रम नऊ वेळा मोडला असला, तरी त्याने ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणे हेच त्याच्यासाठी मोठे यश मानले जाईल.

कोणाकडून पदकाची सर्वाधिक अपेक्षा?

गेल्या ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णकमाई करणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा, बॅडमिंटनमध्ये एकेरीत सिंधू, तर दुहेरी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडी, बॉक्सिंगमध्ये दोन वेळची जगज्जेती निकहत झरीन यांच्याकडून पदकाची सर्वाधिक अपेक्षा बाळगण्यात येत आहे. यंदाच्या हंगामात त्यांची कामगिरी फारशी चांगली नसली, तरी सुरुवातीच्या फेऱ्यांमधील यश त्यांचा आत्मविश्वास उंचावू शकते.

नेमबाजी आजपासून

नेमबाजी स्पर्धा प्रकाराला आज, शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. रायफल प्रकारातील मिश्र दुहेरीतील लढतीने स्पर्धेचा आणि भारतीय पदकाचा श्रीगणेशा व्हावा अशीच भारतीयांना आशा आहे. पिस्तूल प्रकारात मनू भाकरखेरीज दिव्यांश पन्वर, इलावेनिल वलारिवन, सिफ्त कौर सामरा, ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर यांच्याकडून सरस कामगिरीची अपेक्षा बळगली जात आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांना एकही पदक जिंकता आले नव्हते. यावेळी मात्र नेमबाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा असेल.

ऑलिम्पिक कामगिरी

● भारताने आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासात एकूण ३५ पदके जिंकली आहेत, ज्यात १० सुवर्ण, ९ रौप्य आणि १६ कांस्यपदकांचा समावेश आहे.

● स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक कुस्तीगीर स्व. खाशाबा जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी स्पर्धेत मिळवले होते. त्यांनी कांस्यपदकाची कमाई केली होती.

● भारताला सर्वाधिक पदके हॉकीने मिळवून दिली आहे. यात आठ सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशा एकूण १२ पदकांचा समावेश आहे.

● वैयक्तिक प्रकारात अभिनव बिंद्रा (नेमबाजी, २००८ बीजिंग) आणि नीरज चोप्रा (भालाफेक, २०२० टोक्यो) या दोनच भारतीयांना आजवर ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवता आले आहे.

यंदाचा भारतीय संघ

अॅथलेटिक्स : २९ (११ महिला, १८ पुरुष), नेमबाजी : २१, हॉकी : १९, टेबल टेनिस : ८, बॅडमिंटन : ७, कुस्ती : ६, तिरंदाजी : ६, बॉक्सिंग : ६, गोल्फ : ४, टेनिस : ३, जलतरण : २, नौकानयन : २, ज्युडो, अश्वारोहण, रोईंग, वेटलिफ्टिंग (प्रत्येकी १).