scorecardresearch

वेस्ट इंडिजविरुद्ध सराव सामन्यासाठी अध्यक्षीय संघाची घोषणा, करुण नायरकडे नेतृत्व

पृथ्वी शॉ-श्रेयस अय्यरलाही संघात स्थान

करुण नायर अध्यक्षीय संघाचा कर्णधार

आगामी वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेआधी होणाऱ्या सराव सामन्यासाठी बीसीसीआयने आज अध्यक्षीय संघाची घोषणा केली आहे. १३ सदस्यीय संघाचं नेतृत्व करुण नायरकडे देण्यात आलेलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, मयांक अग्रवाल या खेळाडूंना अध्यक्षीय संघात जागा देण्यात आलेली आहे. ४ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत २ कसोटी सामने खेळणार आहे.

असा असेल विंडिजविरुद्ध भारताचा अध्यक्षीय संघ –

करुण नायर (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, अंकित बावने, इशान किशन (यष्टीरक्षक), जलल सक्सेना, सौरभ कुमार, बसिल थम्पी, आवेश खान, के. विघ्नेश, इशान पोरेल

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India announce board presidents xi squad for windies warm up match