मॅके : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात होत असून मॅके येथे होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.

न्यूझीलंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघबांधणीच्या दृष्टीने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताने द. आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिका गमावल्या. या मालिकांमध्ये मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही.

’ वेळ : पहाटे ५.३५ वा.

’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स