मॅके : दडपणाखाली असलेल्या भारतीय महिला संघातील गोलंदाजांची रविवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कसोटी लागणार आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यातील मोठ्या पराभवानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात २७४ धावा केल्या. मात्र, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुका भारताला महागात पडल्या. अखेरच्या षटकात झुलन गोस्वामीने दोन नो-बॉल टाकले. राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा या तीन फिरकीपटू मिळून एक बळी मिळवू शकल्या. फलंदाजीत सलामीवीर स्मृती मानधनाला शफाली वर्मा, कर्णधार मिताली राज आणि दीप्ती शर्माने साथ देणे गरजेचे आहे.

हरमनप्रीतबाबत प्रश्नचिन्ह
भारताची उपकर्णधार हरमनप्रीत कौरला अंगठ्याच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांना मुकावे लागले. तिसºया सामन्यातही ती खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. हरमनप्रीत दुखापतीतून सावरल्यास भारताला तिच्या अनुभवाचा फायदा होईल. मात्र, मागील काही सामन्यांत तिलाही सातत्यपूर्ण खेळ करता आलेला नाही.

  सामन्याची वेळ : पहाटे ५.३५ वा.पासून