scorecardresearch

वॉर्नरच्या कसोटी भविष्याविषयी निर्णय घेण्याची वेळ – टेलर

वॉर्नर खरंच इतका काळ कसोटी खेळू शकेल का याबाबत शंकाच आहे.

mark taylor remark on david warner
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर

सिडनी : सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरचे कसोटी क्रिकेटमधील अपयश लक्षात घेता त्याच्या भविष्याविषयी निर्णय घेण्याची वेळ आली आहे आणि निवड समितीने याबाबत अ‍ॅशेस मालिकेपूर्वी विचार करावा असे आवाहन ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने केले आहे.

‘‘वॉर्नर सध्या लयीत नाही. त्याला २०२४ पर्यंत खेळायचे आहे. या वर्षी वॉर्नरला इंग्लंडविरुद्धही खेळायचे आहे. पण, वॉर्नर खरंच इतका काळ कसोटी खेळू शकेल का याबाबत शंकाच आहे. निवड समिती आणि कर्णधार पॅट कमिन्स यांचा याबाबत अखेरचा निर्णय असेल,’’ असेही टेलर म्हणाले.

आगामी अ‍ॅशेस मालिकेसाठी निवड समितीची पहिली पसंती अर्थातच वॉर्नरला असेल. त्याच वेळी त्यांच्यासमोर बँक्रॉफ्ट आणि रेनशॉ यांचेही पर्याय असतील. ‘‘इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेसाठी आतापासूनच विचार करण्याची वेळ आली आहे. मालिका सुरू झाल्यावर विचार करावा लागू नये असे वाटते. पूर्ण तयारीसह इंग्लंडविरुद्ध उतरणे अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरक्षित आहे अशी खात्री वाटणारा एक तरी खेळाडू संघात असावा ही अपेक्षा आहे. पण, आता याबाबत कुणीच खात्री देऊ शकत नाहीत,’’ असेही टेलर म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 02:11 IST
ताज्या बातम्या