India B vs India A Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी २०२४ चे सामने सुरू झाले आहेत. पहिल्याच दिवशी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. भारत ए वि भारत बी चा सामना खेळवला जात आहे. तर दुसरीकडे, भारत सी वि भारत डी चा सामना खेळवला जात आहे आणि या सामन्यातही गोलंदाजांची कामगिरी पाहायला मिळत आहे. अनंतपूर आणि बेंगळुरूच्या खेळपट्ट्यांमध्ये फलंदाजांसाठी फारशी मदत मिळाली नाही. अपेक्षेच्या विरुद्ध वेगवान गोलंदाजांना भारतीय खेळपट्ट्यांवर खूप मदत मिळत आहे. भारत बी संघाकडून यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतही फलंदाजीसाठी मैदानात उतरला. रस्ते अपघातानंतर आणि मोठ्या ब्रेकनंतर ऋषभ पंतने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. अभिमन्यू ईश्वरन आणि शुबमन गिल यांच्याकडे संघाचे कर्णधारपद आहे. शुभमन गिल भारत ए चा कर्णधार आहे. भारत बी विरुद्धच्या सामन्यात त्याने ऋषभ पंतचा अप्रतिम झेल टिपला. हेही वाचा - Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाने राजकारणात ठेवले पाऊल, पत्नी रिवाबा जडेजाने फोटो शेअर करत दिली माहिती आकाश दीपविरुद्ध, फलंदाजी करताना पंतने चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटला नीट आदळला नाही आणि मिडऑफच्या दिशेने हवेत गेला. शुभमन गिल तिथे क्षेत्ररक्षण करत होता. गिलने मागे धावत जाऊन डाईव्ह करून जबरदस्त चेंडू टिपला. मागे धावत जाऊन डाईव्ह करून झेल टिपणं हा क्रिकेटमधील सर्वात कठीण कॅचपैकी एक मानला जातो. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातानंतर प्रथम श्रेणी सामना खेळत आहे. पहिलाच चेंडू ऋषभला फुल टॉस चेंडू मिळाला आणि त्यावर त्याने एक चौकारही मारला. त्यानंतर त्याने डावातील १०व्या चेंडूवर विकेट टाकली, पंत ७ धावा करत बाद झाला. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. हेही वाचा - गंभीर आजाराशी लढा देतोय ‘हा’ भारतीय वंशाचा क्रिकेटपटू, दिल्लीतील रूग्णालयात ICUमध्ये केलं दाखल भारत बी संघाची मधली फळी पहिल्या डावात पूर्णपणे अपयशी ठरली. ५३ धावांवर संघाची दुसरी विकेट पडली. संघाने ३१ धावांमध्ये पुढील ५ विकेट गमावल्या. सर्फराज खानच्या बॅटमधून केवळ ९ धावा आल्या. पंत बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर नितीश रेड्डी खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. वॉशिंग्टन सुंदरलाही एकही धाव करता आली नाही. तर साई किशोरही १ धाव करत बाद झाला. मुशीर खान एका टोकाला पाय घट्ट रोवून७८ धावा करत उभा आहे. तर त्याच्यासह नवदीप सैनी फलंदाजी करत आहे. इंडिया ए कडून खलील अहमद, आकाशदीप सिंग आणि आवेश खान यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.