सलामीला शिखर धवन की केएल राहुल? | India Bangladesh 1st ODI India vs Bangladesh match 2022 amy 95 | Loksatta

सलामीला शिखर धवन की केएल राहुल?

भारत-बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना आज

सलामीला शिखर धवन की केएल राहुल?
शिखर धवन संग्रहित छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

मिरपूर : बांगलादेशविरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ सलामीवीराच्या भूमिकेसाठी अनुभवी शिखर धवन आणि केएल राहुल यांच्यापैकी कोणाला पसंती देणार याकडे सर्वाचे लक्ष असेल.भारतीय संघाने पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने विचार करण्यास आता सुरुवात केली आहे. या मालिकेत शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली असून सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मासह धवन आणि राहुल यांचा पर्याय भारताकडे उपलब्ध आहे.

राहुलने गेल्या काही काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. मात्र, मधल्या फळीसाठी भारताकडे अन्य बरेच पर्याय असल्याने राहुलला सलामीला संधी दिली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणे निश्चित असून श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकेल. ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता असून तो यष्टीरक्षणाची धुरा सांभाळेल. गोलंदाजीची भिस्त अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर यांच्यावर असेल.दुसरीकडे, बांगालादेशचा नवनियुक्त कर्णधार लिटन दास चांगल्या कामगिरीने मालिकेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.

’ वेळ : सकाळी ११.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३, टेन ५

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 05:31 IST
Next Story
अपराजित्व राखण्यात ब्राझील अपयशी; सर्बियाचा बचाव भेदत स्वित्झर्लंड बाद फेरीत