India vs Bangladesh 2nd Test Highlights: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीतही भारताने जबरदस्त विजय मिळवला आहे. भारताने बांगलादेशचा ८ विकेट्सने पराभव करत मालिका २-० ने जिंकली आहे. पावसामुळे ड्रॉ होणाऱ्या सामन्यात भारताने मिळवलेला विजय संघासाठी पुढील कसोटी मालिकांच्या तुलनेत सकारात्मक दृष्टिकोन देणारा आहे. कानपूर कसोटीतील पहिल्या तीन दिवसांमध्ये पावसामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ झाला. टीम इंडियाला सामन्याच्या चौथ्या दिवशी फलंदाजीची संधी मिळाली, जिथे भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत अवघ्या ३४.४ षटकांत आक्रमक फलंदाजी करत २८५ धावा केल्या.

भारतीय संघाने बांगलादेशला २३३ धावांवर ऑल आऊट केल्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल आक्रमक फलंदाजी सुरू केली. यानंतर येणाऱ्या इतर फलंदाजांनीही हीच कामगिरी सुरू ठेवली. भारताने २८५ धावांचा टप्पा गाठला आणि आकाश दीप बाद होताच कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला. यासह, २१ व्या शतकात ही पहिलीच वेळ आहे की एखाद्या संघाने ५० षटकांपूर्वीच पहिला डाव घोषित केला आहे.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताची मोठी झेप, अंतिम फेरीसाठी दावेदारी मबजूत

भारतीय संघाची कानपूर कसोटीत ऐतिहासिक कामगिरी

२१ व्या शतकात पहिल्या डावात ५० षटकांपूर्वीच डाव घोषित करणारा भारत पहिलाच देश ठरला. यापूर्वी ७० वर्षांपूर्वी केवळ एकाच संघाने ही कामगिरी केली होती. गेल्या ७० वर्षात ही दुसरी वेळ आहे जेव्हा एखाद्या संघाने आपला पहिला डाव ३५ षटकांपूर्वी घोषित केला आहे. २००० मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यातही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएने डाव घोषित करून सर्वांनाच चकित केले आणि इंग्लंडला असे लक्ष्य दिले की इंग्लिश कर्णधार नासेर हुसेनचाही यावर विश्वास बसेना.

हेही वाचा – “रोहितचा मेसेज स्पष्ट होता, आऊट झालो तरी हरकत नाही…”, फलंदाजीपूर्वी संघाला कर्णधाराने नेमकं काय सांगितलं? राहुलने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हॅन्सी क्रोनिएने मात्र नंतर या सामन्याबाबत मॅच फिक्सिंगचे सर्व आरोप मान्य केले. हा सामना तीन दिवसांत संपला. पण भारत-बांगलादेश सामन्यात मात्र स्थिती वेगळी आहे. रोहितने घेतलेला निर्णय खूप धाडसी आहे. कानपूर कसोटी जिंकत रोहित शर्माने एक नवे उदाहरण सर्वांसमोर मांडले आहे. पावसामुळे व्यत्यय आलेल्या आणि ड्रॉ होऊ घातलेल्या कसोटी सामन्यात भारताने मिळवलेला हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. भारताने सलग १८वी मालिका भारताने जिंकली आहे.