scorecardresearch

Premium

ICC Rankings : राशिद खानला मागे टाकत रवी बिश्नोई ठरला टी-२० क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज, पाहा क्रमवारी

Ravi Bishnoi Top Bowler in T20 : रवी बिश्नोईने अफगाणिस्तानच्या राशिद खानला मागे टाकत पहिले स्थान मिळविले आहे. बिश्नोई ६९९ रेटिंगसह पहिल्या स्थानावर तर राशिद ६९२ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.

Ravi Bishnoi Top Bowler in ICC T20 Rankings
रवी बिश्नोई ठरला टी-२० क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज (फोटो-बीसीसीआय एक्स)

Ravi Bishnoi Top Bowler in ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकतीच पाच सामन्याची टी-२० मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई चमकदार कामगिरी होती, ज्याचा आता त्याला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत फायदा झाला आहे. तो आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. रवी बिश्नोईने अफगाणिस्तानच्या राशिद खानला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. आता बिश्नोई ६९९ रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहेत, तर राशिद ६९२ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.

बिश्नोईची ऑस्ट्रेलिया मालिकेतील कामगिरी –

रवी बिश्नोई याआधी आयसीसी टी-२० क्रमावारीत पाचव्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीनंतर त्याने महेश तिक्षाना, आदिल रशीद, वानिंदू हसरंगा आणि राशिद खान यांना मागे टाकले आहे. रवी बिश्नोईने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. त्याने या मालिकेतील ५ सामन्यात सर्वाधिक ९ विकेट घेतल्या. रवी बिश्नोईला त्याच्या या कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आले होते.

Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
Sajeevan Sajna hit a winning six off the last ball against Delhi Capitals
WPL 2024 : कोण आहे सजीवन सजना? जिच्या एका षटकाराने वेधले सर्व जगाचे लक्ष
Yashasvi Jaiswal's second consecutive double century against England
IND vs ENG : द्विशतकानंतर यशस्वी जैस्वालची विराट-कांबळीच्या विक्रमाशी बरोबरी, गावसकरांच्या क्लबमध्येही मिळवले स्थान
Rohit Sharma taunts Jadeja Video Viral
IND vs ENG : नो बॉलवरून रोहित शर्माचा जडेजाला टोमणा, लाईव्ह सामन्यात म्हणाला “अरे यार आयपीएलमध्ये तर…”

सूर्याचे अव्वल स्थान राहिले अबाधित –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार असलेला सूर्यकुमार यादव टी-२० फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती. सूर्याने ५ सामन्यात २८.८० च्या सरासरीने १४४ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली होती.

हेही वाचा – Umran Malik : ‘दुधातून माशी जशी…’, वेगवान गोलंदाजाला टीम इंडियातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूने निवड समितीवर साधला निशाणा

बिश्नोईला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही मिळाली संधी –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या रवी बिश्नोईला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही संधी मिळाली आहे. बिश्नोईला टी-२० संघात स्थान मिळाले आहे. तर सूर्यकुमार यादवला फक्त टी-२० संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली फलंदाजी करणाऱ्या रिंकू सिंगची वनडे संघात निवड झाली आहे. संजू सॅमसनलाही वनडे संघात स्थान मिळाले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India bowler ravi bishnoi overtakes rashid khan to top the latest t20 rankings released by icc vbm

First published on: 06-12-2023 at 16:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×