India cricket Team schedule after IPL 2026: दोन महिन्यांच्या थरारक आणि रंगतदार लढतीनंंतर आयपीएल २०२६ हंगामाचा शेवट झाला. अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर ५ विकेट्सने विजय मिळवत इतिहासातील दुसरं आयपीएल विजेतेपद पटकावलं. आयपीएलनंतर आता अवघ्या काही दिवसांतच टीम इंडिया भारताच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. भारतीय संघाचं पुढील वेळापत्रक कसं असणार आहे, जाणून घेऊया.

आयपीएल संपून अवघ्या एका आठवड्यात भारतीय क्रिकेट पुन्हा आंतरराष्ट्रीय रंगमंचावर परतणार आहे. ६ जूनपासून न्यू चंदीगडमध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय मालिकांना सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ ६ ते २० जूनदरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मुल्लानपूर येथे होणारी कसोटी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) चक्राचा भाग नसणार आहे.

यानंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान एकूण सात टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. ऑगस्ट महिन्यात श्रीलंकाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत दोन कसोटी सामने नियोजित आहेत. मात्र, या मालिकेचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस भारताच्या २०२६-२७ हंगामातील घरच्या मैदानावरील आंतरराष्ट्रीय मालिकांना सुरुवात होणार आहे.

या कालावधीत भारतीय संघाला कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या फॉरमॅटमधील सामने खेळायचे असून संघाचं व्यस्त वेळापत्रक असणार आहे. विशेष म्हणजे, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने एकदिवसीय मालिकांना मोठं महत्त्व असणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचं २०२६ मधील वेळापत्रक

कालावधीमालिकायजमानसामने
६ ते २० जूनअफगाणिस्तानचा भारत दौराभारत१ कसोटी, ३ एकदिवसीय
२६ ते २८ जूनभारताचा आयर्लंड दौराआयर्लंड२ टी-२० आंतरराष्ट्रीय
१ ते १९ जुलैभारताचा इंग्लंड दौराइंग्लंड५ टी-२० आंतरराष्ट्रीय, ३ एकदिवसीय
२३ ते २६ जुलैभारताचा झिम्बाब्वे दौराझिम्बाब्वे३ टी-२० आंतरराष्ट्रीय
वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाहीभारताचा श्रीलंका दौराश्रीलंका२ कसोटी
२७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरवेस्ट इंडिजचा भारत दौराभारत३ एकदिवसीय, ५ टी-२० आंतरराष्ट्रीय
वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाहीभारताचा न्यूझीलंड दौरान्यूझीलंड२ कसोटी, ३ एकदिवसीय, ५ टी-२० आंतरराष्ट्रीय
१३ ते २७ डिसेंबरश्रीलंकेचा भारत दौराभारत३ एकदिवसीय, ३ टी-२० आंतरराष्ट्रीय

भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिका २०२६: संपूर्ण वेळापत्रक

एकमेव कसोटी: ६ ते १० जून – न्यू चंदीगड
पहिला एकदिवसीय: १३ जून – धर्मशाला
दुसरा एकदिवसीय: १७ जून – लखनौ
तिसरा एकदिवसीय: २० जून – चेन्नई

भारताचा कसोटी संघ:

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).

भारताचा एकदिवसीय संघ:

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.