CWG 2026 Day 10 India Schedule: कॉमनवेल्थ गेम्स २०२६च्या १०व्या दिवशी भारताचा संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. ज्युडोमध्ये शुक्रवारी मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर भारतीय खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला असून, शनिवारी ज्युडो, ॲथलेटिक्स, पॅरा ॲथलेटिक्स आणि बॉक्सिंग या स्पर्धांमध्ये भारताला आणखी पदकांची आशा आहे.

शुक्रवारी तब्बल १० भारतीय बॉक्सरांनी अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर आता शनिवारी हे सर्व खेळाडू सुवर्णपदकासाठी रिंगमध्ये उतरतील. नरेंद्र बेरवाल, सचिन सिवाच, लव्हलिना बोर्गोहेन, प्रिया घंघास, साक्षी चौधरी, जादूमणी सिंग, अरुंधती चौधरी, जैस्मिन लांबोरिया, अंकुश पंघाल आणि प्रीती पवार हे आपल्या-आपल्या गटात सुवर्णपदक जिंकण्याच्या निर्धाराने लढत देणार आहेत.

ॲथलेटिक्समध्ये प्रवीण चित्रावेल आणि सेल्वा प्रभू थिरुमारन हे तिहेरी उडी (ट्रिपल जंप) स्पर्धेत पदकासाठी प्रयत्न करतील, तर गुलवीर सिंह पुरुषांच्या ५ हजार मीटर शर्यतीत आणखी एक पदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. ज्युडोमध्ये तीन भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई केल्यानंतर आता शनिवारी इतर खेळाडूही त्याच यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज असतील.

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ : १ ऑगस्ट रोजी भारताचं वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार)

  • दुपारी २:३० – ट्रॅक सायकलिंग, पुरुष स्प्रिंट पात्रता फेरी – डेव्हिड बेकहॅम, रोनाल्डो सिंग, रोजित सिंग
  • दुपारी २:३५ – पॅरा ॲथलेटिक्स, पुरुष गोळाफेक F57 अंतिम फेरी – सोमन राणा, शुभम जुयाल
  • दुपारी २:४० – ॲथलेटिक्स, पुरुष तिहेरी उडी (ट्रिपल जंप) अंतिम फेरी – प्रवीण चित्रावेल, सेल्वा प्रभू थिरुमारन
  • दुपारी २:५० – पॅरा ॲथलेटिक्स, पुरुष १५०० मीटर T54 अंतिम फेरी – रमेश शन्मुगम
  • दुपारी ३:०० – ॲथलेटिक्स, महिला १०,००० मीटर रेस वॉक अंतिम फेरी – प्रियांका, रवीना
  • दुपारी ३:२७ – ट्रॅक सायकलिंग, पुरुष स्प्रिंट प्री-क्वार्टरफायनल – डेव्हिड बेकहॅम, रोनाल्डो सिंग, रोजित सिंग (पात्रतेच्या अधीन)
  • दुपारी ३:३० – बॉक्सिंग, महिला ५४ किलो अंतिम फेरी – प्रीती पवार
  • दुपारी ३:४५ – बॉक्सिंग, महिला ५७ किलो अंतिम फेरी – जैस्मिन लांबोरिया
  • दुपारी ३:५० – लॉन बॉल्स, पुरुष दुहेरी गटसाखळी सामना – नवनीत सिंग, दिनेश कुमार
  • दुपारी ३:५४ पासून – ज्युडो, महिला ६३ किलो राऊंड ऑफ १६ – उन्नती शर्मा
  • दुपारी ४:०३ – ट्रॅक सायकलिंग, पुरुष स्प्रिंट उपांत्यपूर्व फेरी – डेव्हिड बेकहॅम, रोनाल्डो सिंग, रोजित सिंग (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • सायं. ४:१५ – बॉक्सिंग, पुरुष ५५ किलो अंतिम फेरी – जादूमणी सिंग मांडेंगबाम
  • सायं. ४:१९ – ट्रॅक सायकलिंग, पुरुष १० किमी स्क्रॅच रेस पात्रता फेरी – हर्षवीर सिंग सेखों, दिनेश कुमार (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • सायं. ४:३६ पासून – ज्युडो, पुरुष ९० किलो राऊंड ऑफ १६ – करणजीत सिंग मान
  • सायं. ५:०० पासून – ज्युडो, महिला ६३ किलो उपांत्यपूर्व फेरी – उन्नती शर्मा (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • सायं. ५:१८ पासून – ज्युडो, पुरुष ८१ किलो उपांत्यपूर्व फेरी – हर्ष तोकस
  • सायं. ५:३० पासून – ज्युडो, महिला ७० किलो उपांत्यपूर्व फेरी – इनुंगनबी ताखेल्लामबाम
  • सायं. ५:३६ पासून – ज्युडो, पुरुष ९० किलो उपांत्यपूर्व फेरी – करणजीत सिंग मान (पात्रता फेरीवर अवलंबून)

टीप: भारतीय ज्युडोपटू पुढील फेऱ्यांसाठी पात्र ठरल्यास दिवसभरात रेपेशाज, उपांत्य फेरी आणि पदकांच्या लढतींमध्ये सहभागी होतील.

  • सायं. ७:३८ – ट्रॅक सायकलिंग, पुरुष स्प्रिंट उपांत्य फेरी – डेव्हिड बेकहॅम, रोनाल्डो सिंग, रोजित सिंग (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री ८:४८ – ज्युडो, महिला ६३ किलो कांस्यपदकाची लढत – उन्नती शर्मा (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री ९:०० – ज्युडो, महिला ६३ किलो अंतिम फेरी – उन्नती शर्मा (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री ९:०० – बॉक्सिंग, महिला ५१ किलो अंतिम फेरी – साक्षी चौधरी
  • रात्री ९:१५ – बॉक्सिंग, महिला ६० किलो अंतिम फेरी – प्रिया घंघास
  • रात्री ९:३० – ज्युडो, पुरुष ८१ किलो कांस्यपदकाची लढत – हर्ष तोकस (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री ९:३० – बॉक्सिंग, महिला ७० किलो अंतिम फेरी – अरुंधती चौधरी
  • रात्री ९:४२ – ज्युडो, पुरुष ८१ किलो अंतिम फेरी – हर्ष तोकस (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री ९:४५ – बॉक्सिंग, महिला ७५ किलो अंतिम फेरी – लव्हलिना बोर्गोहेन
  • रात्री ९:४८ – ज्युडो, महिला ७० किलो कांस्यपदकाची लढत – इनुंगनबी ताखेल्लामबाम (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री १०:०० – ज्युडो, महिला ७० किलो अंतिम फेरी – इनुंगनबी ताखेल्लामबाम (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री १०:०० – बॉक्सिंग, पुरुष ६० किलो अंतिम फेरी – सचिन सिवाच
  • रात्री १०:०२ – ट्रॅक सायकलिंग, पुरुष स्प्रिंट अंतिम फेरी – डेव्हिड बेकहॅम, रोनाल्डो सिंग, रोजित सिंग (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री १०:१५ – बॉक्सिंग, पुरुष ८० किलो अंतिम फेरी – अंकुश पंघाल
  • रात्री १०:२० – लॉन बॉल्स, महिला एकेरी गटसाखळी सामना – नयनमोनी सैकिया
  • रात्री १०:३० – ज्युडो, पुरुष ९० किलो कांस्यपदकाची लढत – करणजीत सिंग मान (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री १०:३० – बॉक्सिंग, पुरुष ९०+ किलो अंतिम फेरी – नरेंद्र बेरवाल
  • रात्री १०:४२ – ज्युडो, पुरुष ९० किलो अंतिम फेरी – करणजीत सिंग मान (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री १०:५० – ट्रॅक सायकलिंग, पुरुष १० किमी स्क्रॅच रेस अंतिम फेरी – हर्षवीर सिंग सेखों, दिनेश कुमार (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री ११:३५ – अॅथलेटिक्स, पुरुष पोल व्हॉल्ट अंतिम फेरी – देव कुमार मीना, कुलदीप कुमार
  • रात्री ११:४५ – लॉन बॉल्स, पुरुष दुहेरी उपांत्य फेरी – नवनीत सिंग, दिनेश कुमार (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • २ ऑगस्ट (भारतीय वेळेनुसार)
  • रात्री १२:१५ – अॅथलेटिक्स, पुरुष ५,००० मीटर अंतिम फेरी – गुलवीर सिंग
  • रात्री १:१० – लॉन बॉल्स, महिला एकेरी उपांत्य फेरी – नयनमोनी सैकिया (पात्रता फेरीवर अवलंबून)
  • रात्री १:५० – अॅथलेटिक्स, मिश्र ४×४०० मीटर रिले अंतिम फेरी – राजेश रमेश, विशाल टी.के., अन्सा बाबू, नीरू पाठक, रशदीप कौर