भारत-इंग्लंड कसोटी मालिका : भारत-इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी आजपासून

जून महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडने भारताला धूळ चारली.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वातील अंतिम फेरीत पराभव पत्करल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नव्या अभियानाला प्रारंभ करण्यासाठी सज्ज आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली लढत बुधवारपासून नॉटिंगहॅम येथे प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवण्यात येणार आहे.

जून महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडने भारताला धूळ चारली. या लढतीत कोहलीने केलेल्या संघनिवडीवरसुद्धा अनेकांनी टीका केली. त्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्याभराचा कालावधी कोहलीच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा परीक्षा पाहणारा ठरणार आहे.

मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींचे ग्रहण लागले असून रोहित शर्माच्या साथीने के. एल. राहुलला सलामीसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. मधल्या फळीत कोहलीसह चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत यांचे स्थान पक्के असेल. रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन यांच्यापैकी एकाला वगळून चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय कोहली घेऊ शकतो. भारताकडे जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर असे उत्तम पंचक उपलब्ध आहे.

दुसरीकडे, जो रूटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडचे पारडे नक्कीच जड असून स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन ही अनुभवी वेगवान जोडी त्यांचे प्रमुख अस्त्र आहे. मात्र अष्टपैलू बेन स्टोक्सची त्यांना उणीव जाणवू शकते.

’ सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३

संघ

’ भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

’ इंग्लंड : जो रूट (कॅप्टन), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉवली, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, डोम सिबली, मार्क वूड.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India england test series first test match akp

ताज्या बातम्या