Ind vs NZ : थरारक सामन्यात बाजी मारुनही भारतीय संघाला दंड, जाणून घ्या कारण…

चौथ्या सामन्यात भारताची सुपरओव्हरमध्ये बाजी

आंतरराष्ट्री सामन्यात भारतीय संघाचं एकदातरी प्रतिनिधीत्व करावं अशी प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करताना नावही आणि पैसा दोन्हीही मिळतो.

न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सुपरओव्हरमध्ये बाजी मारत, मालिकेत ४-० ने आघाडी केली. नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूरने अखेरच्या षटकांत भेदक मारा करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. यानंतर सुपरओव्हरमध्ये विजयासाठी आवश्यक असलेल्या १४ धावा भारताने सहज पूर्ण करत बाजी मारली. मात्र यानंतरही आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे.

सामन्यात षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी भारतीय संघाच्या मानधनामधून ४० टक्के रक्कम कापून घेण्यात आलेली आहे. निर्धारीत वेळेत भारतीय संघ दोन षटकं मागे होता. त्यामुळे भारतीय संघाने आयसीसीच्या Article 2.22 नियमाचा भंग केल्याचा ठपका सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी ठेवला. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आरोप मान्य केल्यामुळे या प्रकरणी सुनावणी न करता संघाच्या मानधनातून ४० टक्के रक्कम कापून घेण्याची शिक्षा सुनावली आहे. या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India fined for slow over rate in fourth t20i against new zealand psd

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या