अनुभवी कर्णधार सरदारासिंग याला आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत विश्रांती देण्यात आली असून त्याच्याऐवजी मध्यरक्षक मनप्रीतसिंग हा भारताचे नेतृत्व करणार आहे. जपानमध्ये २ ते १० नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. हॉकी इंडियाने भारतीय संघाची निवड जाहीर केली.
मनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने कनिष्ठ गटाच्या सुलतान जोहर चषक स्पर्धा जिंकली होती. भारताचा पहिला सामना चीनविरुद्ध २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर भारतास जपान (३ नोव्हेंबर), ओमान (५ नोव्हेंबर), पाकिस्तान (७ नोव्हेंबर) व मलेशिया (८ नोव्हेंबर) यांच्याशी सामना खेळावा लागणार आहे.
भारतीय संघ
गोलरक्षक-सुशांत तिर्की, हरजोतसिंग.
बचावरक्षक-गुरजिंदरसिंग, अमित रोहिदास, सुरेंद्रकुमार, सुखमानजितसिंग, परदीप मोर,. मध्यरक्षक-प्रभदीपसिंग, मनप्रीतसिंग (कर्णधार), सतबीरसिंग, हरजीतसिंग, इम्रानखान, कोठाजितसिंग (उपकर्णधार).
आघाडी फळी-मलाकसिंग, मनदीपसिंग, तलविंदरसिंग, आकाशदीपसिंग, रमणदीपसिंग.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2013 रोजी प्रकाशित
आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा : सरदारासिंगला विश्रांती, मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व
अनुभवी कर्णधार सरदारासिंग याला आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत विश्रांती देण्यात आली असून त्याच्याऐवजी मध्यरक्षक मनप्रीतसिंग हा भारताचे नेतृत्व करणार आहे.
Written by admin

First published on: 29-10-2013 at 04:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India hockey team declared for asian champions trophy