पॉचेस्ट्रम : १९ वर्षांखालील (कुमारी) विश्वचषक ट्वेन्टी -२० किकेट स्पर्धेत अव्वल सहा संघांच्या फेरीत भारताला शनिवारी ऑस्ट्रेलियाकडून सात गडी राखून पराभव पत्करावा लागला.प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव १८.५ षटकांत ८७ धावांत संपुष्टात आला. सलामीची फलंदाज श्वेता सेहरावत (२१), हर्षिता बसू (१४) आणि तितास सधू (१४) वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
ऑस्ट्रेलियाच्या सिआन्ना जिंजरने १३ धावांत ३ गडी बाद केले. मिली इिलगवर्थ आणि मॅगी क्लार्कने प्रत्येकी दोन गडी बाद करून सिआन्नाला सुरेख साथ केली.ऑस्ट्रेलियाच्या मुलींनी १३.५ षटकांत ३ बाद ८८ धावा केल्या. क्लेरी मूर (२५) आणि अॅमी स्मिथ (२६) यांची चौथ्या विकेटसाठी झालेली ५१ धावांची नाबाद भागीदारी निर्णायक ठरली.
संक्षिप्त धावफलक
भारत : १८.५ षटकांत (श्वेता सेहरावत २१, हर्षिता बसू १४; सिआन्ना जिंजर ३/१३, मिली इिलगवर्थ २/१२) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : १३.५ षटकांत ३ बाद ८८ (क्लेरी मूर नाबाद २५, अॅमी स्मिथ नाबाद २६; तितास सधू १/१३, अर्चना देवी १/७)