बेंगळूरु : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघात आठ नवोदित आणि आठ अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व के लेल्या आठ हॉकीपटूंचा समावेश आहे. भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपाल हिच्याकडे सोपवण्यात आले असून ड्रॅगफ्लिकर गुरजित कौर, उदिता, निशा, नेहा, नवनीत कौर, शर्मिला देवी, लालरेमसियामी या नवोदित खेळाडू संघात असतील.

मिझोरामची सलिमा टेटे हिलाही भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. राणीसह गोलरक्षक सविता, दीप ग्रेस इक्का, सुशिला चानू, मोनिका, निक्की प्रधान, नवज्योत कौर आणि वंदना कटारिया या अनुभवी खेळाडूंवर भारताची भिस्त राहील.

भारतीय महिला हॉकी संघ

गोलरक्षक – सविता. बचावपटू – दीप ग्रेस इक्का, निक्की प्रधान, गुरजित कौर, उदिता. मध्यरक्षक – निशा, नेहा, सुशिला चानू, मोनिका, नवज्योत कौर, सलिमा टेटे. आघाडीवीर – राणी रामपाल, नवनीत कौर, वंदना कटारिया, लालरेमसियामी,  शर्मिला देवी.