India need a win in the second ODI against New Zealand today Sports news ysh 95 | Loksatta

India vs NZ 2nd ODI: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!

India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्ध रविवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा आहे.

India vs NZ 2nd ODI: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
शुभमन गिल

आज न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजय गरजेचा

हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्ध रविवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा आहे. तसेच भारतीय संघाला मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी या सामन्यात विजय अनिवार्य आहे.

भारतीय संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ ०-१ अशा पिछाडीवर आहे. इडन पार्कच्या छोटय़ा मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात धवन आणि गिल जोडीला ‘पॉवर-प्ले’च्या १० षटकांत ४० धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांत धवन आणि गिल यांनी अधिक आक्रमकता दाखवणे गरजेचे आहे.

  • वेळ : सकाळी ७ वा.
  • थेट प्रक्षेपण : अ‍ॅमेझॉन प्राइम, डीडी स्पोर्ट्स

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 01:05 IST
Next Story
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात