scorecardresearch

Premium

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका; तिसऱ्या लढतीतही भारत पराभूत

अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने तीन बळी मिळवत छाप पाडली.

India New Zealand ODI series India also lost the third match

अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने तीन बळी मिळवत छाप पाडली. परंतु भारतीय संघ तिसऱ्या सामन्यातही शुक्रवारी अपयशी ठरला. त्यामुळे यजमान न्यूझीलंडने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकांत सर्व बाद २७९ अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर सब्भीनेनी मेघना (६१), शफाली वर्मा (५१) आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा (नाबाद ६९) यांच्या अर्धशतकांनी भारताच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. मग न्यूझीलंडची सुरुवात २ बाद १४ अशी खराब झाली. परंतु अ‍ॅमी सॅटरवेट (५९) आणि अमिलिया कर (६७) यांच्या १०३ धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडचा डाव सावरला. मग आणखी तीन फलंदाज तंबूत परतल्यामुळे न्यूझीलंडची ३५व्या षटकात ६ बाद १७१ अशी अवस्था झाली. परंतु लॉरेन डाऊनच्या नाबाद ६४ धावांमुळे न्यूझीलंडने या सामन्यात निसटता विजय मिळवला.

IND vs AUS: Shreyas-Shubman's dignified centuries and Surya's innings India's highest score against Australia
IND vs AUS: श्रेयस-शुबमनची खणखणीत शतकं अन् सूर्याच्या झंझावाती खेळी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने उभारली सर्वोच्च धावसंख्या
IND vs AUS 1st ODI: Team India becomes No.1 in ICC ranking after beat Australia by five wickets Shubman-Rituraj excellent batting
IND vs AUS 1st ODI: टीम इंडिया बनली नंबर १! भारताची ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने मात, शुबमन-ऋतुराज चमकले
IND vs AUS 1st ODI: India win the toss and decide to bowl Ashwin-Shreyas Iyer return to the squad see playing 11
IND vs AUS 1st ODI: भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; अश्विन-श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन, पाहा प्लेईंग-११
Kuldeep creates history in Sri Lanka match fourth bowler to take 150 wickets
Kuldeep Yadav: श्रीलंका-पाकिस्तान सामन्यात कुलदीपने रचला इतिहास, १५० विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज; म्हणाला, “निवृत्तीनंतर मी…”

संक्षिप्त धावफलक

भारत : ४९.३ षटकांत सर्व बाद २७९ (दीप्ती शर्मा नाबाद ६९, सब्भीनेनी मेघना ६१; हन्ना २/५२, रोसमेरी मैर २/४३) पराभूत वि. न्यूझीलंड : ४९.१ षटकांत ७ बाद २८० (अमिलिया कर ६७, लॉरेन डाऊन नाबाद ६४, अ‍ॅमी सॅटरवेट ५९; झुलन गोस्वामी ३/४७)

‘पराभवांची चिंता नाही’

भारतीय महिला संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील चारही सामने गमावले आहेत. मात्र, या पराभवांची प्रशिक्षक रमेश पोवार यांना चिंता वाटत नसून निराशाजनक कामगिरीला विलगीकरणाचा अतिरिक्त कालावधी कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘‘आम्हाला सराव करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळाला. न्यूझीलंड दौऱ्याच्या तयारीसाठी इतका कमी कालावधी पुरेसा नाही,’’ असेही पोवार म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India new zealand odi series india also lost the third match abn

First published on: 19-02-2022 at 01:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×