India Squad Announced New Zealand ODI Series: न्यूझीलंड मालिकेसाठी अखेरीस एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघ जाणार असून दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी वेगळा तर अखेरच्या दोन सामन्यांसाठी वेगळा संघ जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये शुबमन गिल तर उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर संघाचं नेतृत्त्व करेल.
न्यूझीलंडविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी दोन संघ का जाहीर करण्यात आले?
एकदिवसीय मालिकेसाठी भारताचे दोन संघ जाहीर करण्यात आले आहेत. शुबमन गिल व श्रेयस अय्यर दोन कर्णधार असणार आहेत. एकदिवसीय मालिका ४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. तर दोन सामन्यांची कसोटी मालिका १९ नोव्हेंबरपासून खेळवली जाईल. एकदिवसीय व कसोटी मालिकेत फक्त ३ दिवसांचा फरक असल्याने कसोटी क्रिकेटच्या तयारीसाठी एकदिवसीय संघातील खेळाडू बाहेर पडतील आणि त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर संघाचं नेतृत्त्व करेल.
एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी संघात चार बदल करण्यात आले आहेत; कर्णधार शुबमन गिलसह केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा आणि अंशुल कंबोज हे खेळाडू या दोन सामन्यांत खेळणार नाहीत. त्यांच्या जागी कुमार कुशाग्र, यश ठाकूर, तिलक वर्मा आणि आकिब नबी यांचा समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या ३ वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर बराड, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, ईशान किशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा (फिटनेसवर अवलंबून) आणि कुलदीप यादव.
चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर बराड, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर आणि कुलदीप यादव.
