पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत शानदार विजयांची नोंद करीत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. महिला एकेरीत अग्रमानांकित आणि माजी विश्वविजेत्या सिंधूने ३६ मिनिटांत २१ वर्षीय अश्मिताला २१-७, २१-१८ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत हैदराबादच्या २६ वर्षीय सिंधूचा थायलंडच्या सहाव्या मानांकित सुपानिडा कॅटरथाँगशी सामना होणार आहे. सिंगापूरच्या तिसऱ्या मानांकित येओ मिनने आजारपणामुळे माघार घेतल्याने सुपानिडाला पुढे चाल मिळाली. याआधी २०१९च्या राष्ट्रीय स्पर्धेत सिंधूने आसामच्या अश्मिताला नामोहरम केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India open badminton tournament pv sindhu semifinals ysh
First published on: 15-01-2022 at 02:13 IST