इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : मालविकाचा सायनावर सनसनाटी विजय

सिंधूने इरा शर्मावर २१-१०, २१-१० असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत तिची अश्मिता छलिहाशी गाठ पडणार आहे.

नवी दिल्ली : नागपूरची उदयोन्मुख बॅडिमटनपटू मालविका बनसोडने इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत गुरुवारी तिची प्रेरणास्थान असलेल्या सायना नेहवालवर सनसनाटी विजय मिळवला. मालविकासह ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांनी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

२० वर्षीय मालविकाविरुद्धच्या लढतीत सायनाने १७-२१, ९-२१ अशी हार पत्करली. जागतिक क्रमवारीत १११व्या क्रमांकावरील मालविकाने फक्त ३४ मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात आणले. आकर्षी कश्यपने केयुरा मोपाटिनला २१-१०, २१-१० असे हरवले.

सिंधूने इरा शर्मावर २१-१०, २१-१० असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत तिची अश्मिता छलिहाशी गाठ पडणार आहे. अश्मिताने फ्रान्सच्या याईली होयॉक्सचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला.

पुरुष एकेरीत मिथुन मंजुनाथने माघार घेतल्याने प्रणॉयला पुढे चाल मिळाली. लक्ष्य सेनने स्वीडनच्या फेलिक्स ब्यूरेस्टेडचा २१-१२, १२-१५ असा पराभव केला. कॅनडाच्या ब्रायन यँगविरुद्धची लढत समीर वर्माने दुखापतीमुळे अर्धवट सोडली.

पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने श्याम प्रसाद व एस. संजित जोडीला २१-९, २१-१८ असे पराभूत केले.

सायनाविरुद्ध मी प्रथमच सामना खेळले. सायनाला आदर्श मानूनच बॅडिमटन खेळायला प्रारंभ केल्यामुळे हा सामना माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा होता. त्यामुळे जय-पराजयाचा फारसा विचार केला नव्हता. हा माझा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.मालविका बनसोड

करोनामुळे श्रीकांतसह सात जणांची माघार

नवी दिल्ली : करोनाची लागण झाल्यामुळे जागतिक उपविश्वविजेत्या किदम्बी श्रीकांतसह सात जणांना गुरुवारी इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. करोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, रितिका राहुल ठक्कर, ट्रीसा जॉली, मिथुन मंजूनाथ, सिम्रन अमन सिंग आणि खुशी गुप्ता यांची नावे भारतीय बॅडिमटन संघटनेच्या निश्चितीनंतर जागतिक बॅडिमटन महासंघाने जाहीर केली. ‘‘मंगळवारी घेण्यात आलेल्या अनिवार्य आरटी-पीसीआर करोना चाचणीत सात खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. यापैकी दुहेरीत खेळणाऱ्या संपर्कातील खेळाडूंनाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. याचप्रमाणे प्रतिस्पर्धी खेळाडूंना पुढे चाल देण्यात आली आहे,’’ असे जागतिक बॅडिमटन महासंघाने स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India open malvika bansod sensational victory over saina nehwal zws

Next Story
Pro Kabaddi League : बंगाल वॉरियर्स आणि पुणेरी पलटन विजेते!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी