India opening match against Spain Hockey World Cup International field ysh 95 | Loksatta

विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची स्पेनशी सलामी

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची सलामीची लढत तुलनेने दुबळय़ा स्पेनशी होणार आहे.

विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची स्पेनशी सलामी
विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची स्पेनशी सलामी

पीटीआय, नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची सलामीची लढत तुलनेने दुबळय़ा स्पेनशी होणार आहे. हा सामना उद्घाटनाच्या दिवशी १३ जानेवारीला रुरकेला येथे नव्याने उभारलेल्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचा इंग्लंड, स्पेन आणि वेल्स या संघांसह ड-गटात समावेश करण्यात आला आहे. वेल्स यंदा विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करणार आहे. या स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका मंगळवारी जाहीर करण्यात आली. भारताचा दुसरा सामना १५ जानेवारीला इंग्लंडशी, तर अखेरचा साखळी सामना १९ जानेवारीला वेल्सशी होईल.

या स्पर्धेच्या अ-गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियासह अर्जेटिना, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे. जगज्जेते बेल्जियम, जर्मनी, कोरिया आणि जपान हे संघ ब-गटात आहेत. क-गटात न्यूझीलंड, मलेशिया, चिली आणि नेदरलँड्स हे संघ आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी किलगा स्टेडियमवर अर्जेटिना विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दु. १ वा.), ऑस्ट्रेलिया विरुद्ध फ्रान्स (दु. ३ वा.) असे सामने होणार आहेत. रुरकेला येथील नव्या मैदानावर भारताचा सामना सायंकाळी ७ वाजता होईल. या मैदानावर इंग्लंड आणि वेल्स यांच्यात सायंकाळी ५ वाजता पहिला सामना होईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कार्लसनकडून निमनवर फसवणुकीचा आरोप!

संबंधित बातम्या

Rohit Sharma Injured: जखमी असूनही खेळायला उतरला रोहित, पत्नी रितिका आणि सूर्यकुमारच्या ट्विटने जिंकले मन
IND vs BAN: “हाफ-फिट खेळाडू देशासाठी खेळत आहेत…’: दुखापतीनंतर निराश रोहित शर्माचा एनसीएला कडक इशारा
IND vs BAN: “जर फलंदाजीला यायचंच होतं तर…” कर्णधार रोहित शर्मावर सुनील गावसकर भडकले
IND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका! रोहित शर्मासहित तीन खेळाडू शेवटच्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर
IND vs BAN 2nd ODI: गडी एकटा निघाला! हाताला पट्टी तरी रोहित टीम इंडियासाठी लढला, चाहत्यांचा कडक सॅल्यूट

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Rohit Sharma Thumb Injury: “…आणि तो मैदानावर परतला”; रोहित शर्माच्या झुंजार अर्थशतकानंतर प्रशिक्षक द्रविडचं विधान
IND vs BAN: “आमचा खेळण्याचा दृष्टीकोन हा एक दशक…” माजी क्रिकेटपटूंची टीम इंडियावर चोहीकडून टीका
मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनसवर वर्षभरात दोन नवीन फलाट; मेल-एक्स्प्रेस सोडण्याची क्षमता वाढणार
लग्नानंतर रात्रीच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटला घेऊन गेला अन्…; फोटो व्हायरल
पुणे : वर्तुळाकार रस्ता जानेवारीपासून मार्गावर; भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात