भारत-पाकिस्तान बहुचर्चित सामना रविवारी झाला. दोन देशातील दुराव्यामुळे खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही. भारताने वर्ल्डकपमधलं वर्चस्व कायम राखलं. हसतखेळत नसले तरी भारत-पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंमध्ये एका मुद्यावर साम्य आहे. ते म्हणजे गाड्यांची आवड. दोन्ही संघांतील खेळाडूंकडे एकापेक्षा एक लक्झरी गाड्या आहेत.
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या ताफ्यात ४.७ कोटींची लॅम्बोर्गिनी ही गाडी आहे. लॅम्बोर्गिनी SE plug in hybrid असं या गाडीचं औपचारिक नाव आहे. याच्याबरोबरीने रोहितकडे टेस्लाचं Y ही गाडीही आहे. याव्यतिरिक्त रोहितच्या घरी रेंज रोव्हर HSE LWB, मर्सिडीझ बेंझ GLS 400d या गाड्या आहेत. ३०१५ अशी खास कस्टमाईज्ड नंबरप्लेटही त्याने तयार करून घेतली आहे.
विराट कोहली गाड्यांबाबत शौकीन आहे. बेंन्टले कॉन्टिनेंटल जीटी ही गाडी विराटच्या गॅरेजचं आभूषण आहे. फ्लाइंग स्पर, पोर्शे ९११ टर्बो एस, रेंज रोव्हर व्होग, लॅम्बोर्गिनी हराकन, बीएमडब्ल्यू एम५, ऑडी यांच्यासह टोयाटो फॉर्च्युनर अशा असंख्य भारी गाड्या कोहलीकडे आहेत.
अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे रोल्स रॉईस फँथम ही लक्झरी गाडी आहे. व्ही १२ इंजिनाने युक्त अशी ही गाडी आहे. पंड्याच्या गॅरेजमध्ये लॅम्बोर्गिनी हराकन ईव्हीओ, लॅम्बोर्गिनी युरूस एसई, मर्सिडीझ एएमजी जी६३, रेंज रोव्हर व्होग/एसव्ही, लेक्सस एलएम, ऑडी ए६ आणि जीप कंपास या गाड्या आहेत.
श्रेयस अय्यरकडे लॅम्बोर्गिनी हराकन ईव्हीओ ही गाडी आहे. याव्यतिरिक्त श्रेयसकडे मर्सिडीझ एएमजी ६३ आणि ऑडी एस५ या गाड्या आहेत.
पाकिस्तानचा प्रमुख फलंदाज बाबर आझमकडे ऑडी एस५, ऑडी इ ट्रॉन जीटी अशा दोन गाड्या आहेत. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदी ऑडी ए८ हायब्रिड, टोयोटा लँड क्रुझर, ऑडी ए४, होंडा सिव्हिक, टोयोटा रेव्हो, टोयोटा फॉर्च्युनर अशा विविधांगी गाड्या आहेत.
शाहीन शहाचा सहकारी हसन अलीकडे किया स्पोर्ताज ही गाडी आहे तर असिफ अली आणि शदाब खान यांच्याकडे होंडा सिव्हिक ही गाडी आहे.

