Paris Paralympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर पॅरालिम्पिक खेळांना काही दिवसांनी सुरूवात होणार आहे. पॅरालिम्पिक खेळ २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत पॅरिसमध्ये होणार आहे. पण या पॅरालिम्पिक खेळांपूर्वी भारताला एक मोठा धक्का बसला आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये खेळणार नाही, याची घोषणा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने केली आहे.

हेही वाचा – Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”

भारताचा टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रमोद भगतने डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८ महिन्यांसाठी त्याला निलंबित करण्यात आल्याची घोषणा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF) केली आहे. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत तो सहभागी होणार नाही. “टोकियो २०२० पॅरालिम्पिक चॅम्पियन प्रमोद भगतला १८ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे आणि तो पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक गेम्समध्ये देखील सहभागी होणार नाही,” BWF ने एका निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?

प्रमोद भगत वर्षभरात तीनवेळा स्वत:चा ठावठिकाणा सांगू शकला नाही. याप्रकरणी दोषी आढळल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. “१ मार्च २०२४ रोजी, आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (CAS) डोपिंग विरोधी विभागाने भगत यांना १२ महिन्यांत तीन वेळा ठावठिकाणा सांगू न शकल्याने BWF अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले.”

प्रमोद भगत यांनी अपील करूनही, CAS अपील विभागाने निलंबन कायम ठेवत निर्णय बदलला नाही. ॲथलीट भगत पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक गेम्समध्ये सहभागी होणार नाही. “२९ जुलै २०२४ रोजी सीएएस अपील विभागाने भगत यांचे अपील फेटाळले. १ मार्च २०२४च्या CAS अँटी-डोपिंग विभागाच्या निर्णयाची पुष्टी केली. त्याच्या अपात्रतेचा कालावधी आता लागू झाला आहे.”

हेही वाचा – Neeraj Chopra: नीरज चोप्रा ऑलिम्पिकनंतर भारतात परतण्याऐवजी जर्मनीला रवाना, नेमकं काय आहे कारण?

प्रमोद भगतने या वर्षाच्या सुरुवातीला थायलंडच्या पटाया येथे २०२४ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या डॅनियल बेथेलला एका तगड्या लढतीत पराभूत करून पुरुष एकेरीच्या SL3 चे विजेतेपद कायम ठेवले. ३५ वर्षीय भगतने एक तास ४० मिनिटे झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्याचा १४-२१, २१-१५, २१-१५ असा पराभव केला. भगतचे हे चौथे एकेरीचे जागतिक विजेतेपद होते. याआधी त्याने २०१५, २०१९ आणि २०२२ मध्ये तीन वेळा हेच पदक जिंकले होते. २०१३ च्या जागतिक स्पर्धेत त्याने पुरुष दुहेरीचे सुवर्णपदकही जिंकले आहे.