आशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारत-इराण सामन्यात गोलशून्य बरोबरी

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या सुरुवातीला इराणच्या संघाने आक्रमक खेळ केला.

नवी मुंबई : भारतीय महिला संघाला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या गुरुवारी झालेल्या सलामीच्या लढतीत इराणने गोलशून्य बरोबरीत रोखले. यजमान भारताला या सामन्यात गोलच्या बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा करून घेण्यात त्यांना अपयश आले.

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या सुरुवातीला इराणच्या संघाने आक्रमक खेळ केला. त्यांना गोल करण्यासाठी दोन उत्तम संधी मिळाल्या, ज्यापैकी एक फटका क्रॉसबारलाही लागला. यानंतर मात्र भारताने दमदार पुनरागमन करताना सकारात्मक खेळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी इराणची बचाव फळी आणि गोलरक्षक यांच्यावर दडपण टाकले. त्यांनी छोटे-छोटे पास करतानाच चांगले क्रॉसही केले. ७६व्या मिनिटाला राखीव फळीतील डांगमे ग्रेसला गोल करण्याची सर्वोत्तम संधी मिळाली. मात्र, तिने हेडरमार्फत मारलेला फटका इराणची गोलरक्षक झोहरे कुंडेइने अप्रतिमरित्या अडवला. त्यामुळे भारताला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले.

अ-गटात समाविष्ट असलेल्या भारतीय संघाचा दुसरा साखळी सामना रविवारी चायनीज तैपेइविरुद्ध रंगणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India play out a 0 0 draw against iran in the afc women s asian cup 202 zws

Next Story
Pro Kabaddi League : ८ गुणांची ‘ती’ रेड अन् फिरला सामना..! बंगाल वॉरियर्सनं बंगळुरू बुल्सला चारली धूळ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी