IND vs ENG 1st ODI India Playing 11: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. पहिला वनडे सामना बर्मिंगहममध्ये खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी ब्रुकने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह भारतीय संघ गोलंदाजीने पहिल्या वनडे सामन्याला सुरूवात करणार आहे. भारतीय संघाचे त्रिमूर्ती जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा व विराट कोहली परतले आहेत.
रोहित आणि विराट सहा महिन्यांनंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये एकत्र खेळताना दिसतील, तर जसप्रीत बुमराह ९६८ दिवसांनंतर वनडेमध्ये पुनरागमन करत आहे. एजबॅस्टनवर बुमराहला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० बळींचा टप्पा गाठण्याची संधी असेल; तो या टप्प्यापासून केवळ एका बळीच्या अंतरावर आहे.
रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल हे फलंदाज असतील. तर शिवम दुबेला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू संघाचा भाग असतील. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, गुरनूर ब्रार व प्रसिध कृष्णा असतील. अर्शदीप सिंग व कुलदीप यादव या दोन गोलंदाजांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही.
भारतीय संघ व्यवस्थापनाचा सर्वात आश्चर्यकारक निर्णय फिरकी गोलंदाजीबाबत पाहायला मिळाला. कर्णधार शुबमन गिलने संघाचा नियमित फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं आणि त्याऐवजी फिरकी गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरवर विश्वास दाखवला. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर एखाद्या तज्ज्ञ फिरकी गोलंदाजाशिवाय मैदानात उतरणं, ही अत्यंत आश्चर्यकारक चाल मानली जात आहे. संघाची खोली आणि फलंदाजीची ताकद वाढवण्यासाठी, सुंदरसोबतच अक्षर पटेलची अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंडविरूद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह, प्रसीद कृष्णा
इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टंग, आदिल रशीद
