India Playing 11 Announced IND vs WI 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून सुरू होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना केरळमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकली असून शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजने सामन्याला सुरूवात करेल. यासह भारताची प्लेईंग इलेव्हन कशी आहे, जाणून घेऊया.
भारताकडून नमन धीरने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, अक्षर पटेलसारखे महत्त्वाचे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघाचा भाग नसल्याने नव्या खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली आहे. नमन धीरला वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय संघात पहिल्यांदाच संधी मिळाली होती आणि पहिल्याच संधीत त्याला भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली आहे.
नमन धीरने नुकत्याच पार पडलेल्या ‘शेर-ए-पंजाब टी-२० लीग’मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने धुमाकूळ घातला. ८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘मोहाली किंग्स’विरुद्ध ‘अमृतसर सुरमाज’ संघाकडून खेळताना त्याने अवघ्या ६४ चेंडूंमध्ये १७३ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली आणि केवळ ३७ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने १६ चौकार आणि १२ षटकार लगावले. संपूर्ण स्पर्धेतील नमन धीरच्या या जबरदस्त फलंदाजीमुळेच निवडकर्त्यांनी त्याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड केली.
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड मधल्या फळीत फलंदाजीला उतरणार आहे. रोहित शर्मा-शुबमन गिलची जोडी सलामीला उतरले, तर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. यानंतर नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा व नमन धीर असतील. तर गोलंदाजीत प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार हे वेगवान गोलंदाज आहेत. तर कुलदीप यादवही प्लेईंग इलेव्हनमध्ये आहे.
पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुबमन गिल (क), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), नमन धीर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा
