रशियामध्ये होणाऱ्या २०१८च्या फुटबॉल विश्वचषक स्पध्रेच्या प्राथमिक पात्रता फेरीसाठी भारतीय संघाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. इराण आणि तुर्कमेनिस्तान संघांविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी निवडण्यात आलेल्या या संघात सुनील छेत्रीसह संभाव्य २८ खेळाडूंचा समावेश आहे.  भारतीय संघ : गोलरक्षक: सुब्राता पॉल, गुरप्रीत सिंग संधू, करनजीत सिंग, टी.पी. रेहेनीश; बचावपटू: आयबोरलँग खोंगजी, ऑगस्टीन फर्नाडिस, अर्नब मोंडल, प्रितम कोटल, संदेश जिंगन, रायनो अँटो, नारायण दास, लालछुनमाविआ; मध्यरक्षक: प्रणॉय हॅल्डर, बिकाश जैरू, कॅव्हिन लोबो, रोवलिंग बोर्गेस, अ‍ॅलवीन जॉर्ज, मोहम्मद रफीक, मालसावझुआला, फ्रान्सिस फर्नाडिस, हरमनज्योत सिंग खाब्रा, उदंता सिंग, विनित राय, सेइत्यसेन सिंग; आघाडीपटू: जेजे लाल्पेखलूआ, सुनील छेत्री, सुमित पास्सी, हलिचरण नार्जरी.