scorecardresearch

Premium

नागल आर्थिक विवंचनेत; टेनिसपटूंसाठी निधीचा प्रश्न कायम!

सुमितला या अडचणीमुळे जर्मनीतील नॅन्सेल टेनिस अकादमीतील प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

Indias Top Tennis Player Sumit Nagal Is In Financial Trouble
टेनिसमध्ये एकेरीतील भारताचा अव्वल खेळाडू सुमित नागल

नवी दिल्ली : टेनिसमध्ये एकेरीतील भारताचा अव्वल खेळाडू असलेला सुमित नागल सध्या मोठय़ा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. एटीपी मालिकेतील स्पर्धा खेळण्यासाठी आवश्यक एक कोटी रुपयांची जुळवाजुळव केल्यानंतर सुमितच्या बँक खात्यात एक लाखाहूनही कमी रक्कम शिल्लक आहे.

भारतीय टेनिसपटूंसाठी निधीचा प्रश्न कायमच उभा राहिला आहे. खेळाडू एकाकी लढत देत आहेत. देशाचा आघाडीचा खेळाडू स्वत:साठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी पैसे वाचवू शकत नाही, ही वस्तुस्थिती खेळाडूंची असाहाय्यता दाखविण्यास पुरेशी आहे. सुमितला या अडचणीमुळे जर्मनीतील नॅन्सेल टेनिस अकादमीतील प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

disney hotstar and Gautam Adani
डिस्ने हॉटस्टार गौतम अदाणींकडे जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
implementation of Multiple Entry and Multiple Exit
विश्लेषण: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातली ‘मल्टिपल एंट्री, मल्टिपल एग्झिट’ची अंमलबजावणी आव्हानात्मक का?
Womens-reservation
महिला आरक्षण : ‘हा’ हक्क मिळवण्यासाठी अमेरिकेला १४४ तर ब्रिटनला १०० वर्षे लागली; भारतीय महिलांना ‘या’ दिवशी…
Vidarbha Madhyamik Teachers Association
बाह्ययंत्रणेमार्फत शिक्षक भरतीला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा विरोध; सरकारने पुनर्विचार करावा : आमदार अडबाले

एटीपी मालिकेत खेळण्यासाठी सुमितने त्याची सर्व पारितोषिक रक्कम, इंडियन ऑइलकडून मिळणारे संपूर्ण मानधन आणि महा टेनिस फाऊंडेशनकडून मिळणारा निधी असे सारे पणाला लावले आहे.

हेही वाचा >>> ICC WC23 Anthem: ‘दिल जश्न बोले’! आयसीसीने केलं वर्ल्डकप अँथम गीत लाँच, रणवीर अन् धनश्रीचा हटके डान्स, Video व्हायरल

सुमित म्हणाला, ‘‘माझ्या बँक खात्यात केवळ ८० हजार रुपये आहेत. महा टेनिस फाऊंडेशनच्या प्रशांत सुतार यांच्याकडून मला निधी मिळतो. इंडियन ऑइलकडून मानधन मिळते. मात्र, एकही मोठा प्रायोजक माझ्याकडे नाही. जे कमावतो, ते गुंतवतो. गाठीशी काहीच उरत नाही. प्रशिक्षक आणि फिजिओंची नियुक्ती केली आहे. मात्र, एटीपी मालिकेत खेळताना मी यापैकी एकाचीच मदत घेऊ शकतो. एका प्रवासी प्रशिक्षकासाठी

मला वर्षांला ८० लाख ते १ कोटी रुपये खर्च करावे लागतात. तडजोडीशिवाय मी आयुष्य जगूच शकत नाही.’’

नागलच्या क्रीडा साहित्याची (रॅकेट, बूट, पोशाख) जबाबदारी योनेक्स आणि असिक्सद्वारे उचलली जाते. सुमितने या वर्षी खेळलेल्या २४ स्पर्धामधून ६५ लाख रुपयांची कमाई केली. यापैकी सर्वाधिक रक्कम (साधारण १८ लाख) त्याला अमेरिका खुल्या स्पर्धेतून मिळाली. गेल्या काही वर्षांपासून मी देशातील एकेरीमधील अव्वल टेनिसपटू आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एकेरीसाठी पात्र ठरणारा मी एकमेव खेळाडू आहे. असे असतानाही शासनाच्या ‘टॉप्स’ योजनेत माझा समावेश नाही. मी आणखी काय करायला हवे? – सुमित नागल

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India s top tennis player sumit nagal is in big financial problem zws

First published on: 21-09-2023 at 01:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×