भारताच्या ‘या’ खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये पटकावलं रौप्य पदक!

भारतानं ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत वैयक्तिक ६ रौप्य पदकं पटकावली आहे.

India-Olympic-Silver
भारतानं ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत वैयक्तिक ६ रौप्य पदकं पटकावली आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या संख्येचा विक्रम यंदा भारत मोडणार का? याकडेच सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. दुसरीकडे भारतानं ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत वैयक्तिक ६ रौप्य पदकं पटकावली आहेत. वेटलिफ्टर मीराबाई चानू, कुस्तीपटू रवीकुमार दहिया, नेमबाज राज्यवर्धन राठोर, नेमबाज विजय कुमार, कुस्तीपटू सुशील कुमार आणि बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांचा यात समावेश आहे.

भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियन ऑलिंपिक कमिटीच्या जावूर युगुयेवशी झाला, पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ने जिंकली. रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असून भारताच्या खात्यात अजून एका पदकाची नोंद झाली आहे.

Olympic: कांस्यपदक विजेत्या हॉकी संघाला पंतप्रधान मोदींनी केला फोन, म्हणाले…

२००४ अँथेस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोर याने मेन्स डबल ट्रॅप शूटींगमध्ये रजत पदक पटकावलं होतं. नेमबाजीतील हे भारताचं पहिलं पदक होतं. त्यानंतर झालेल्या २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी केली. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण ६ पदकं जिंकली होती. त्यात दोन रौप्य पदकांचा समावेश होता. विजय कुमारनं पुरुष गटातील जलद पिस्टल फायरिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं होतं. सुशील कुमारने फ्रिस्टाइल ६६ किलो वजनी गटात रौप्य पदकावर मोहोर उमटवली होती.

१४ वर्षांच्या मुलीनं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जिंकलं गोल्ड मेडल; केला Perfect 10 चा अनोखा विक्रम

२०१६ च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताच्या पदरी फक्त दोन मेडलची भर पडली. महिला फ्रिस्टाइल ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्य पदक मिळवलं. तर पीव्ही सिंधुने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India six athletes win silver medal in olympics rmt

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या