भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय वंशाचे अल्लाउद्दीन पालेकर मुख्य पंचांची भूमिका बजावत आहेत. तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पालेकर यांना प्रथमच कसोटी सामन्यात पंचगिरी करण्याची संधी मिळाली.

पालेकर आफ्रिकेचे ५७वे आणि विश्वातील ४९७वे पंच आहेत. मरायस इरास्मस यांना गुरू मानणारे पालेकर आज त्यांच्याच साथीने पंचगिरी करत आहेत. त्यांचे वडील आणि काकासुद्धा पंच असून रत्नागिरीत खेड तालुक्यात पालेकर यांचे गाव आहे. १५ वर्षांपूर्वी पंच कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या पालेकर यांनी २०१८मध्ये भारत-आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत मैदानावरील पंचाची धुरा वाहिली. १ जानेवारी रोजी पालेकर यांनी वयाची ४४ वर्षे पूर्ण केली. २००६पर्यंत आफ्रिकेतील टायटन्स संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी पंचगिरीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

‘‘जेव्हा मी पंचाची भूमिका बजावण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून एकदा तरी कसोटी सामन्यात पंच म्हणून कार्य करण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले होते. त्यामुळे हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. आज मी ज्या ठिकाणी पोहोचलो, त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली,’’ असे पालेकर म्हणाले.