टी२० नंतर आता टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याआधी टी२० मालिकेत मेन इन ब्लूने २-१ असा विजय मिळवला होता. रोहित शर्मासह टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात समाविष्ट खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवन कर्णधार असेल. तीन सामन्यांच्या टी२०  मालिकेतील हा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेने ४९ धावांनी विजय झाला.

शिखर धवन याने श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. अशात मालिकेपूर्वीच धवनने २०२३मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. तो फिट राहून २०२३मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी खेळायचे आहे.

Gautam Gambhir Praises MS Dhoni
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Virat Reveals Time Spent With Family
IPL 2024 : ‘लोक आम्हाला ओळखत नव्हते’, विराट कोहली दोन महिने कुठे होता? स्वत:च उघड केले गुपित
Virat Kohli and Rachin Ravindra Video Viral
CSK vs RCB : सामन्यादरम्यान कोहलीने पुन्हा उत्साहात गमावले भान, रचिन बाद झाल्यावर अशी दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

रजत पाटीदार पहिल्यांदाच एकदिवसीय संघात खेळणार आहे, मात्र तो गुरुवारी खेळणार नसल्याचे समजत आहे. राहुल त्रिपाठी बऱ्याच दिवसांपासून तंबूमध्ये वेळ घालवत आहे. त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची अपेक्षा आहे. भारत सध्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ८७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने ३५ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने ४९ सामने जिंकले आहेत.

खेळपट्टी आणि हवामान अंदाज

लखनऊच्या एकना स्टेडियमवर कोणत्याही संघाने एकदिवसीय सामना खेळलेला नाही. येथे २०१९ मध्ये, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २३० होती. तथापि, भारताने या मैदानावर दोन टी२० सामने खेळले असून अनुक्रमे १९५ आणि १९९ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील टी२० सामना मार्च २०२० मध्ये लखनऊमध्ये होणार होता, परंतु कोरोना महामारीमुळे हा सामना रद्द करण्यात आला. बीसीसीआयने सांगितलेल्या माहितीनुसार १.३० वाजता नाणेफेक आणि २.०० वाजता सामना सुरु होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  विश्लेषण : मेसी, रोनाल्डोचे विक्रम मोडणारा, फुटबॉल विश्वात सर्वाधिक चर्चेत असलेला हालँड कोण आहे? 

आज उभय संघांमध्ये खेळला जाणारा एकदिवसीय सामनाही कुठेतरी रद्द व्हावा? याला कारण म्हणजे पाऊस आहे. दसऱ्याच्या दिवशी बुधवारी लखनऊमध्ये विक्रमी पाऊस झाला. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.४ मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. या मोसमात एका दिवसात एवढा पाऊस पडला नाही, हे आम्ही तुम्हाला सांगतो. हवामान खात्यानुसार, सामन्याच्या दिवशी म्हणजे ६ ऑक्टोबर रोजी दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एकना स्टेडियमच्या व्यवस्थापनाने सामना सुरू झाल्यानंतर पाऊस न पडल्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे म्हटले आहे. स्टेडियम मालक उदय सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार येथील ड्रेनेज व्यवस्था अत्याधुनिक आहे. अशा परिस्थितीत अवघ्या ३० मिनिटांत पावसाचे पाणी काढून मैदान खेळण्यायोग्य बनवता येते.

हेही वाचा : राष्ट्रकुल स्पर्धेतून कुस्तीला वगळले! ; २०२६च्या स्पर्धेसाठी नेमबाजीचा समावेश  

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, इशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कुलदीप यादव, आवेश खान, मोहम्मद सिराज, राहुल त्रिपाठी, मुकेश कुमार, रुतुराज गायकवाड, शाहबाज अहमद , रवी बिष्णोई

दक्षिण आफ्रिका

जेनेमन मलान, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा(कर्णधार), एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, अॅनरिक नॉर्टजे, हेनरिक क्लासेन, लुंगी एनजीडी हेंड्रिक्स

सामन्याचे थेट प्रक्षेपण- स्टार स्पोर्ट्सवर दुपारी १२.३० वाजता.