India Squad for England ODI Series: अफगाणिस्तानविरूद्ध वनडे मालिकेत भारतीय संघाने निर्भेळ मालिका विजय नोंदवला. भारताने वनडे मालिकेतील तिन्ही सामने जिंकत एकतर्फी विजयाची नोंद केली. मायदेशातील या मालिकेनंतर भारतीय संघ आता युरोप दौऱ्यावर जाणार आहे. जिथे संघ सुरूवातीला आयर्लंड दौरा आणि नंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडविरूद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
इंग्लंडच्या घरच्या मैदानावर ही वनडे मालिका खेळवली जाणार आहे. १४ ते १९ जुलै दरम्यान ही वनडे मालिका खेळवली जात आहे. एजबस्टमध्ये होईल, दुसरा सामना १६ जुलैला सोफिया गार्डन्समध्ये आणि तिसरा सामना १९ जुलैला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाईल. अफगाणिस्तानविरूद्ध वनडे मालिकेसाठीचा जेमतेम सारखाच संघ इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. त्यात विराट कोहली व जसप्रीत बुमराह हे खेळाडू संघात परतले आहेत.
विराट कोहली अफगाणिस्तानविरूद्ध मालिकेत पायाच्या दुखापतीमुळे खेळताना दिसला नव्हता. तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. पण आता इंग्लंडविरूद्ध वनडे मालिकेसाठी हे दोघेही संघात परतले आहेत. विराट कोहलीची संघात निवड झाली आहे, पण त्याचा फिटनेस पाहूनच त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. यशस्वी जैस्वाल व प्रिन्स यादव यांना संघातून डच्चू देण्यात आला आहे.
भारताचा इंग्लंडविरूद्ध मालिकेसाठी एकदिवसीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली*, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.
भारत आणि इंग्लंड वनडे मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
१४ जुलै २०२६ – पहिला वनडे सामना – ३.३० वाजता
१६ जुलै २०२६ – दुसरा वनडे सामना – ५.३० वाजता
१९ जुलै २०२६ – तिसरा वनडे सामना – ३.३० वाजता
याशिवाय आयर्लंडविरूद्धच्या २ सामन्यांच्या टी-२० मालिकेतून वरूण चक्रवर्ती बाहेर झाला आहे. टाटा आयपीएल २०२६ दरम्यान डाव्या पायाला दुखापत झाल्यानंतर, वरुण चक्रवर्ती सध्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपल्या पुनर्वसन प्रक्रियेच्या (rehab) अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे तो आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
आयर्लंडविरूद्ध टी-२० मालिकेसाठी सुधारित संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिध कृष्णा
